
ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्... Video Viral
तरुणीने विजय थलापती यांना भेटण्याची गाठ मनाशी बांधली आणि जंतर मंतरजवळील ट्रॅफिक सिग्नलच्या मधोमध आडवे झोपून ती भेटीसाठीचा हट्ट करु लागली. मुख्य म्हणजे व्हिडिओ महिला पोलिस काॅस्टेबल तरुणीला रस्त्यावरुन उठवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसतात पण तरुणी काहीकेल्या पोलिसांचेही ऐकायला तयार नसते. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून यात दिलेल्या माहितीनुसार ही घटना २९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर घडून आली. एक महिला रस्त्यावरील वाहतूक सिग्नलच्या मधोमध झोपल्याचे यात दिसते. तर दोन महिला पोलिस अधिकारी तिला रस्त्यावरुन उठवण्याचा प्रयत्न करतानाही व्हिडिओत दिसून येतात. व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती जेव्हा तिच्याजवळ जाऊन तिला रस्त्यावर झोपण्याचे कारण विचारतो तेव्हा महिला म्हणते की, “जोपर्यंत थलपती विजय येऊन मला मिठी मारत नाहीत, तोपर्यंत मी इथून जाणार नाही.”
हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
व्हिडिओमध्ये व्यक्ती महिलेला रस्त्यावर उठण्यासाठी तिची समजूत काढताना दिसतो. तो म्हणतो की, इथे झोपून काय फायदा… असे रस्त्यावर झोपून तुम्ही वाहतूक कोंडी करत आहात आणि इतरांना त्रास देत आहात. यावर महिला म्हणते की, मला काही ऐकायचं नाही, मला विजयला मिठी मारायची आहे. यानंतर व्हिडिओत महिला पोलिस महिलेला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतात ज्याावर महिला ओरडून प्रतिकार करते आणि म्हणते की, “मला हात लावू नका, हा माझा अधिकार आहे”. महिलेचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून यूजर्सने तिच्या या वेडसर कृतीवर आपल्या टिका व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “अरे पोलिस मॅडम तिच्या दोन कानाखाली हाणा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला फक्त व्हायरल व्हायचे आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “महिला जास्तच फ्रि दिसतेय”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.