रोड आहे की कार्पेट? तरुणाने कंत्राटदार आणि प्रशासनाचा केला पर्दाफाश,तरुणाने हातानेच उखडून काढला रस्ता; Video Viral
सरकारी काम आणि त्यात भ्रष्टाचार नाही असे होणे फार अशक्य आहे. याचेच जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात एका तरुणाने कॅमेरासमोर प्रशासनाचा भ्रष्टाचार उघड केला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा स्वतःच्या हातांनी बांधलेला रस्ता उखडतो आणि प्रशासनाचा पर्दाफाश करतो. तरुणाचा हा व्हिडिओ प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड करतो. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक आता भ्रष्टाचार आणि निकृष्ट बांधकामाबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण मुलगा आपल्या हातांनी नुकताच बांधलेला रस्ता अक्षरशः आपल्या हातांनी उखडताना दिसून येतो. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की रस्त्यामधील बिटुमेन आणि रेतीचा थर इतका कमकुवत असतो की फक्त हातांनी याला सहजपणे उलटे करता येते. रस्त्याचा थर उपटून, तो मुलगा रस्ता बांधणीत किती निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पाहून असे दिसून येते की कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम धुळीवर खडी आणि बिटुमेन टाकून पूर्ण केले, ज्यामुळे रस्त्याची मजबुती आणि टिकाऊपणा खूपच कमी असल्याचे आढळून आले. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडिओ देशात होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी पुरेसा आहे. व्हिडिओतील दृश्ये धोकादायक असून लोक याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @theindiansarcas नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘काय रोड आहे भावा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रस्त्याचे कंत्राटदार सचिन टिचकुले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावरून किती भेसळ आणि भ्रष्टाचार आहे हे दिसून येते”आणखीन एका युजरने लिहिले आहे, “रोड नाही हा आहे कार्पेट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.