थरारक! भरधाव वेगात कारचालकाने विद्यार्थींनींना जोरदार धडक दिली अन्...; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडत असतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता लोक गाड्या चालवत असतात. यामुळे आतापर्यंत अनेकांचा जीवही गेला आहे. अशा अपघातांच्या घटनांचे भयावह व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळातात. सध्या असात एक थरारक असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उत्तरप्रदेशच्या देहरादूनमध्ये ही घटना घडली आहे. एका भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थींनींच्या गटाला जोरदार धडक दिली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थींनी घरी जाताना दिसत आहेत. रसत्यावर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. रस्ता अगदी छोटा आहे. तसेच काही गाड्या देखील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या आहेत. याच वेळी मागून एका कार भरधाव वेगात येते आणि विद्यार्थींनींच्या एका गटाला धडक देऊन जाते. या धडकेमुळे दोन विद्यार्थींनी जोरदार हवेत उडून जमिनीवर आदळतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या घटनेत 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
School children were crushed by a speeding car in Dehradun. The incident took place on Wednesday afternoon when school children were returning home after school in Selaqui. The speeding car crushed the children. Eight Students are injured
pic.twitter.com/SxoRfzKywH— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 24, 2025
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
अलीकडे वाढते ट्राफिक आणि भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्यांच्या चुकीमुळे अपघांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकवेळा वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. यामुळे लोक स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या व्हायरल होत असलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. या घटनेवर कारवाई झाली का तसेच विद्यार्थींनी सुरक्षित आहेत का याबद्दल काही कळालेले नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या व्हिडिओवर अनेकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी कारचालकाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.