(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओ कधी आपले मनोरंजन करतात तर कधी यातील दृश्ये आपला थरकाप उडवतात. आताही इथे असाच एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात पर्यटक अक्षरशः मृत्यूच्या विळख्यातून बाहेर पडल्याचे दिसून आले. या थरारक आणि भयावह घटनेने केवळ पर्यटकच घाबरवले नाही तर इंटरनेटवरील लोकांचीही झोप उडाली. व्हिडिओमध्ये, एक मोठे अस्वल पाण्याच्या काठावर धावत स्पीड बोटचा पाठलाग करताना दिसून आले.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीला, काही पर्यटक स्पीड बोटवरून नदीकाठावर फिरण्याचा आनंद घेत असल्याचे दिसते. मात्र यानंतर अचानकक तिथे एक अस्वल किनाऱ्यावर येते आणि बोट पाहताच पर्यटकांचा पाठलाग करू लागते. अस्वलाचा वेग इतका वेगवान आहे की तो पाण्यात उतरूनही बोटीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अस्वलाचे हे रूप पाहून पर्यटक घाबरतात आणि लोक भीतीने ओरडू लागतात. ही सर्व घटना एक मुलगा आपल्या फोनवर रेकॉर्ड करतो आणि सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या शेजारी बसलेली महिलाही तिच्या फोनवर हे भयानक दृश्य रेकॉर्ड करते.
ही घटना जंगलाजवळील एका नदीत घडल्याचे सांगितले जाते, जिथे अस्वलांसारख्या वन्य प्राण्यांची उपस्थिती सामान्य आहे. मात्र अस्वल ज्याप्रकारे स्पीड बोटचा पाठलाग करतो आणि पाण्यात उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. बोटीचा वेग जास्त असल्याने पर्यटक अस्वलापासून आपला जीव वाचवण्यास सफल होतात. जर बोटीचा वेग कमी असता तर हा रोमांचक प्रवास एका भयानक अपघातात बदलू शकला असता.
Terrifying reminder that if you think u can out run a bear, no you can’t pic.twitter.com/9bnbBbKPV2
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) November 16, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 26 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “विचार करा जर बोटीचा मोटर थांबला असता तर काय झालं असत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक तपकिरी अस्वल ३० मैल प्रति तास (४८ किमी/तास) वेगाने धावू शकते, जे सरासरी माणसाच्या १० मैल प्रति तास (१६ किमी/तास) वेगाने धावण्याच्या वेगापेक्षा सुमारे तीन पट जास्त आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.