भटक्या कुत्र्यांच्या भीतीने गाय घाबरली, उंच उडी मारली अन् थेट छतावरच जाऊन उभी राहिली; मजेदार Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक मजेदार आणि रंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात कधी आश्चर्यचकित करतात तर कधी भावुक करून जातात. इथे अनेकदा असे दृश्य शेअर केले जाते ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशात आताच इंटरनेटवर एक अनोखा आणि सर्वांना हैराण करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक भलीमोठी गाय भटक्या कुत्र्यांना घाबरुन थेट छतावर चढल्याची अजब-गजब घटना घडून आली आहे. व्हिडिओतील दृश्यांनी सर्वांनाच थक्क केले असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
काय घडलं व्हिडिओत?
कुत्र्यांच्या भीतीने तुम्ही कधी गाय घराच्या छतावर चढताना पाहिली आहे का? नसेल तर आता तुम्हाला हे पाहता येणार आहे. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बोराज मंडलच्या निराला गावात ही धक्कादायक घटना घडून आली आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक गाय घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर जाऊन चढली. आता याबाबत असं सांगितलं जात आहे की, भटक्या कुत्र्यांच्या एका कळपाने गायीचा पाठलाग सुरु केला ज्यामुळे पळत पळत कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी ती थेट एका घराच्या छतावर चढली. गायीला असं छतावर चढल्याच पाहून गावकरी थक्क झाले आणि लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली. दरम्यान गाय इतक्या उंचीवर उडी मारून गेलीच कशी याच रहस्य अजूनही कुणाला उलगडलं नाही.
Cat on a hot tin roof? Nah… this one is #CowOnRooftop; Reportedly chased by dogs, bovine climbed onto roof; incident reported from #Telangana Nirala village, Boraj Mandal, Adilabad district; took lot of effort to bring cow down, without roof of house collapsing under its weight pic.twitter.com/fTPZWbow1F
— Uma Sudhir (@umasudhir) September 15, 2025
घटनेचा व्हिडिओ @umasudhir नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “गौमाता कुत्र्यांना घाबरली हे जरा अजब आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण ती एवढ्या उंचावर गेलीच कशी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला उंचावर चढून संपूर्ण गाव बघायचं असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.