ऑक्टोपसला हात लावणं डायव्हरला पडलं महागात; मानेवरून थेट तोंडापर्यंत गेला अन्... जीवघेण्या हल्ल्याचा Video Viral
समुद्राच्या खोलवर असे अनेक प्राणी राहतात जे दिसायला अगदी साधे वाटत असले तरी ते अतिशय धोकादायक असतात. असाच एक प्राणी म्हणजे ऑक्टोपस. ऑक्टोपस, त्याच्या विचित्र आकारासाठी ओळखला जातो, सामान्यतः मानवांपासून दूर राहतो, परंतु कधीकधी तो समुद्रात खोलवर डुबकी मारणाऱ्या गोताखोरांना भेटतो. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका डायव्हरवर ऑक्टोपसने जीवघेणा हल्ला केल्याचे दिसून आले. ऑक्टोपसची खासियत म्हणजे त्याचे हात-पाय ज्यांना टेंटिकल्स असे बोलले जाते, याने एकदा त्याने कोणाला पकडले की मग त्याचे काही खरे नाही.
गोताखोर अनेकदा पाण्याखालील जगाचा शोध घेण्यासाठी खोल पाण्यात जातात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका ऑक्टोपसने स्कूबा डायव्हरवर हल्ला केल्याचे दिसत आहे. समुद्राचा रोमांचक प्रवास अचानक गोताखोरांसाठी भयानक अनुभवात बदलला. खोल पाण्यात खडकांच्या सानिध्यात डायव्हरवरला एक अनोखा ऑक्टोपस दिसला. हा ऑक्टोपस पाहताच त्याने त्याला पकडू पाहिले मात्र त्यांनतर ऑक्टोपसने त्यावर जो हल्ला केला तो पाहून सर्वच हादरले.
ऑक्टोपसने डायव्हरची मान त्याच्या टेंटिकल्सने पकडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने गोताखोर घाबरला. तो गुदमरायला लागतो, यावेळी त्याच्या वेदना आपल्याला व्हिडिओत स्पस्ष्ट दिसून येतात. ऑक्टोपसची पकड खूप मजबूत असते आणि त्यातून सुटणे खूप कठीण असते. ऑक्टोपसच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी डायव्हरला खूप मेहनत करावी लागते. कसा तरी तो तिच्या तावडीतून सुटतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या वर पोहत जातो. पाण्यातील हा हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, लोक यातील दृश्ये पाहून थक्क झाली आहेत.
A video of an octopus choking a diver after he appeared to disturb the highly intelligent creature has gone viral on social media, sparking widespread reactions.#Diver #Octopus #Attack pic.twitter.com/OZAltdMpq7
— Mojo Story (@themojostory) March 12, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @themojostory नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून लोक आता हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.