(फोटो सौजन्य: Twitter)
जंगलाच्या दुनियेतून एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये जंगलाच्या राजा-राणीमध्ये युद्ध झाल्याचे दिसून आले, चुरशीची ही लढत पाहणे फार मनोरंजक ठरते. या संघर्षात दोन्ही वाघ आणि वाघीण गुरगुरताना आणि एकमेकांवर हल्ला करताना दिसतात, ज्यामुळे संपूर्ण जंगल हादरले. हे भयंकर युद्ध पाहून लोक हैराण झाले असून या थरारक लढतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो आपल्या ताकदीने आणि चपळाईने तो जंगलावर राज्य करतो. वाघाच्या लढतीचे अनेक व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत मात्र आताचा हा व्हिडिओ काहीसा वेगळा आणि मजेदार आहे कारण यात वाघ चक्क वाघिणीशी लढताना दिसून येत आहे. आता या युद्धात पुढे काय घडले आणि कोणी कुणावर विजय मिळवला हे पाहणे फार रोमांचक ठरेल.
व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन शक्तिशाली वाघ एकमेकांशी भिडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सुरुवातीला दोघेही एकमेकांकडे गुरगुरतात, मग अचानक एक वाघ दुसऱ्यावर धडकतो. यानंतर तुंबळ हाणामारी सुरू होते, ज्यामध्ये दोघेही आपली पूर्ण ताकद लावतात. पंजाचे फटके, गर्जना आणि वेगवान हल्ले यामुळे ही लढत इतकी धोकादायक बनते की प्रेक्षकांचे श्वास थांबतात. व्हिडिओत पुढे दोघेही शांत झाल्याचे दिसून येते. हे दृश्य जंगलाचे सत्य दाखवते, जिथे सत्ता आणि वर्चस्वाची लढाई सामान्य आहे.
Tiger vs Tigress fight😱
Just look at the insane size difference between a Tiger and a Tigress.😳 pic.twitter.com/91khSNW1pk
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 10, 2025
जंगलातील या मजेदार युद्धाचा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ वाघ आणि वाघिणीमधील लढाई’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 7 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर लाइक्स दिले आहेत. तसेच काहींनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी एकदा असेच दृश्य पाहिले ज्यात जिथे वाघिणीने वाघावर हल्ला केला आणि नंतर तिला जाणवले की ती लढाई जिंकण्याची शक्यता नाही म्हणून तिने माघार स्वीकारली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे नवऱ्यासोबतही घडते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.