दुसऱ्याची स्कुटर चोरी करायला आले होते, स्वतःची बाइक सोडून पळावे लागले, हास्याने लोटपोट करणारा Video Viral
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक दररोज वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करतात. तुम्हीही ते व्हिडिओ पाहत असाल. यातील काही व्हिडिओ हे व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडिओ म्हणजे सार्वधिक लोकांनी पाहिलेले अथवा लोकांना सर्वाधिक आवडलेले व्हिडिओज. हे व्हिडिओज कधी लोकांना हसवतात, काही थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. यात काही खऱ्या घटनांचे व्हिडिओज देखील सामील असतात. सध्या अशाच एका हास्यापद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . यात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांची झालेली फजिती दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्कूटरवर आलेल्या दोन चोरट्यांनी आपली स्कूटर घराबाहेर उभी करून आत पार्क केलेली स्कूटर चोरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या वाटलं होत तसं काही घडलं नाही तर भलतंच होऊन बसलं. दुसऱ्याची स्कुटर पळवण्यासाठी आलेल्या या चोरांना अक्षरशः स्वतःची स्कुटर सोडून तेथून पळावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ याहून तुम्ही हास्याने लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाही.
हेदेखील वाचा – विशालकाय अजगराला ओढत काढले बाहेर, क्षणार्धात अजगराने घातला गळ्याभोवती विळखा अन् थरारक घटनेचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन चोर एका घरासमोर आपली स्कुटर उभी करून त्या घराबाहेरील स्कुटर चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. यावेळी एक व्यक्ती घराबाहेर आपली स्कुटर उभी करून त्यावर बसलेला दिसतो तर दुसरा व्यक्ती घरमालकाची स्कुटर खेचत बाहेर काढून चोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांनी ही स्कुटर चोरी करून पळून जाण्याचा प्लॅन तयार केलेला असतो मात्र तितक्यात तिथे स्कुटरचा मालक घराबाहेर येतो आणि या दोघांना असे करताना रंगे हाथ पकडतो.
यांनतर मालकाला पाहून दोन्ही चोर घाबरतात आणि तेथून पळून जाण्याचा निर्णय घेता. मात्र तोपर्यंत मालक इतका भिडलेला असतो की पाहता क्षणी तो त्यांना मारायला त्यांच्या मागे धाव घेतो आणि हे पाहून दोन्ही चोरांना आपली स्कुटी सोडून तेथून पळ काढावा लागतो. हे म्हणजे असं झालं, तेलही गेलं, ‘तूपही गेलं हाथी राहीलं धुपाटण’. व्हायरल व्हिडिओतील ही दृश्ये इतकी हास्यापद आहेत की, पाहून कोणालाही हसू अनावर जाईल.
आये थे स्कूटी चोरी करने…
अपनी भी छोड़कर चले गए… 🥲😂 pic.twitter.com/o6sSL1vwoG— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) November 2, 2024
हेदेखील वाचा – जमीन खणताच व्यक्तीला मिळाला रहस्यमयी मटका, खोलताच सोन्याच्या नाण्यांसह आतून निघाले दोन भयावह जीव, Video Viral
चोरांच्या या फजितीचा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दुसऱ्याची स्कुटर चोरायला आले होते स्वतःची पण सोडून निघून गेले’. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कदाचित नवीन चोर असावेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भंडारा चालू होता, तुम्ही आत गेल्यावर पुरी संपली होती आणि बाहेर आल्यावर चप्पल चोरीला गेली होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” आता तो आयुष्यात सर्वांना सल्ला देत फिरेल, भाऊ, कधीही चोरी करू नका.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.