प्राचीन काळी लोकांकडे बँकिंगची सुविधा नव्हती, म्हणून ते आपली मौल्यवान वस्तू गुप्त ठिकाणी ठेवत असत. अनेक लोक त्या वस्तू कोणी शोधू नयेत म्हणून जमिनीत गाडत असत, पण ज्याने त्या पुरल्या त्याचा मृत्यू झाला किंवा तो पुरलेल्या जागेचा पत्ता विसरला तर त्या मौल्यवान वस्तू तिथेच दडून राहायच्या. नंतर अनेक वर्षांनंतर, जेव्हा जेव्हा ती जागा उत्खनन केली गेली तेव्हा या मौल्यवान वस्तू इतरांना सापडल्या. लोकांना अनेकदा अशी पुरलेली केलेली संपत्ती सापडली आहे.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात तर काही पोट धरून हसवतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरले. अलीकडेच, एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याला पुरलेला एक मटका सापडतो. यात खजिना दडून ठेवल्याचे समजते, परंतु त्या खजिन्यासह ठेवलेल्या वस्तूमध्ये दोन भीतीदायक प्राणी देखील आढळून येतात. हे दृश्य खूपच थरारक आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – दिवाळीनिमित्त दोन हॉस्टेलमध्ये झाले युद्ध, विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, थरकाप उडवणारी दृश्ये अन् Video Viral
मटक्यातून निघाले दोन भयावह जीव
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जमीन खोदत आहे आणि नंतर त्याला एक मोठे भांडे सापडले जे एका मटकाच्या आकारात आहे. त्यानंतर, हा व्यक्ती मोठ्या उत्साहाने हा मटका उघडतो मात्र यातून जे बाहेर येते ते पाहून त्याला धक्काच बसतो. कारण त्यातून एक साप आणि बेडूक बाहेर येतात. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे साप बेडूक खातात, पण या भांड्यात दोघेही बंद होते, मग सापाने ते का खाल्ले नाही. तसेच वर्षानुवर्षे दडवलेल्या या मटक्याच्या हे दोन्ही जीव जिवंत राहिलेच कसे? या रहस्यमयी गोष्टीमागचे गूढ तर काही समजले नाही. पुढे या व्हिडिओत व्यक्ती काठीच्या मदतीने या दोंन्ही जीवांना बाहेर काढताना दिसून येतो यानंतर यात आत सोन्याची नाणी तुडुंब भरल्याचे दिसून येते.
हेदेखील वाचा – चूक कोणाची? रस्त्यावरील ज्वलंत फटका श्वानाने टाकला तोंडात अन् पुढच्याच क्षणी… धक्कादायक VIdeo Viral
हा व्हायरल व्हिडिओ @altindefineavcisi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जादुई खजिना शोधण्याचा क्षण’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा तर दिवसाचं श्रीमंत झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्क्रिप्टेड आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.