
एकीचे बळ! चारही बाजूंनी घेरलं अन् वाघाच्या कुटुंबाने अवघ्या 1 सेकंदातच केली हरणाची शिकार; Video Viral
वाघ हा जंगलाचा सर्वात खतरनाक प्राणी आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणूनही त्याला विशेष ओळख आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो मोठमोठ्या प्राण्यांनाही शिकस्त देतो आणि त्यांची शिकार करतो. वाघाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज आपण सोशल मिडियावर पाहिले असतील पण संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेल्या शिकारीचे हे दृश्यच न्यारे. एकीचे बळ मोठ्या गोष्टींवर विजय मिळवण्यास मदत करते आणि वाघाच्या कुटुंबानेही हाच विचार करत एकत्र मिळून शिकारीच्या खेळात विजय मिळवला. चला या दृश्यात नक्की काय घडून आलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जंगलात शिकारीसाठी चांगलीच रणनीती आखल्याचे दिसून येते. दोन वाघ वेगवेगळ्या दिशेला लपलेले असतात तर तिसरा वाघ दूरून येणाऱ्या हरणावर निशाणा साधून असतो. हरीण जवळ येत आहे हे जाणवताच वाघ त्याच्यावर हल्ला करतो. हा हल्ला इतका जबरदस्त असतो की हरणाला आपले प्राण वाचवण्यासाठी संधीच मिळत नाही. हरणाला जमिनीवर पाडताच झुडपात लपलेले इतर दोन वाघही मदत करण्यासाठी जवळ जातात आणि इथेच या दृश्याचा शेवट होतो. एकत्र येऊन कठीणातली कठीण गोष्ट देखील सहज मिळवू शकतो, हे आपल्याला या व्हिडिओतून शिकायला मिळते.
That’s how a group of tigers hunts as a team. Some surge forward to startle the deer while others quietly close in to block their escape. They use walkie-talkies and Bluetooth to stay in touch.pic.twitter.com/9X1MhtAs6J — Amit💫🤟🏼 (@meamitshuklaa) October 23, 2025
वाघाच्या या अनोख्या शिकारीचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून लोक त्यांच्या या रणनीतीची चांगलीच प्रशंसा करत आहेत. शिकारीचा हा व्हिडिओ @meamitshuklaa नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अशाप्रकारे वाघांचा एक गट एकत्रितपणे शिकार करतो. काही हरणांना घाबरवण्यासाठी पुढे सरकतात तर काही त्यांच्या पळून जाण्यापासून रोखण्यासाठी शांतपणे जवळ येतात. संपर्कात राहण्यासाठी ते वॉकी-टॉकी आणि ब्लूटूथ वापरतात’.
That’s how a group of tigers hunts as a team. Some surge forward to startle the deer while others quietly close in to block their escape. They use walkie-talkies and Bluetooth to stay in touch.pic.twitter.com/9X1MhtAs6J — Amit💫🤟🏼 (@meamitshuklaa) October 23, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.