(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर वन्य प्राण्यांचेही बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. जंगलातील शिकारीचे दृश्य पाहणे रंजक ठरते पण यावेळी कोणत्या शिकारीचा नाही तर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपण प्राण्यांना समोरासमोर लढताना, भिडताना पाहिले असेल परंतू आताच्या व्हिडिओत मात्र एक वयोवृद्ध आज्जीच जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाशी लढताना दिसून आली. ज्याला पाहताच लोक चार हात लांब पळून जातात अशा जंगलाच्या राजाला काठीने मारण्यासाठी आज्जीने धाव घेतली आणि मग जे घडलं ते फार हास्यास्पद होत. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रस्त्यात एक ट्रक आणि काही लोक घाबरुन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून येते. खरंतर ते सिंहाच्या भितीने घाबरुन उभे असतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडीत सिंह लपलेला असतो. भितीचे वातावरण सुरु असतानाच या दृश्यात एक नवीन मनोरंजक ट्वीस्ट येतो. काहीच वेळात एक आज्जी रागातच काठी घेऊन सिंहाला मारायला जाते. ती निर्भयपणे काठीने सिंहाला मारण्याचा प्रयत्न करते हे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. विशेष म्हणजे, जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंहही आज्जीच्या हल्ल्याला घाबरतो आणि दुसऱ्याच क्षणी झाडीत पळून जातो. रस्त्यावर उभे असलेले लोकही हे दृश्य पाहून चकीत होऊन जातात. हे दृश्य इतके मजेदार आणि अविश्वसनीय असते की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. यूजर्स मात्र आज्जीच्या धाडसाचे मनभरुन काैतुक करतात.
हा मजेदार व्हिडिओ @multiversematrix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा, आज्जी व्वा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही आजी खरी जगदंबा आहे, म्हणूनच तिने तिच्या स्वाराला ते समजावून सांगितले आणि तोही सहमत झाला. जय भवानी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आज्जीचं सिंह जातीमध्ये उठण बसणं असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






