(फोटो सौजन्य: Instagram)
मुले म्हणजे देवाघरची फुले हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. पण हिच मुले आता फुलांसारखी कोमल राहिली नाहीत. मस्तीमस्ती अनेकदा पालकांच्या समस्या वाढवताना दिसून येतात. स्मार्टफोनच्या वापरामुळे तर मुलांचा खोडसरपणा आता आणखीनच वाढला आहे आणि अशातच आता एक नवीन धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका चिमुकलीने चक्क स्वत:च्याच नाकात टोकदार पेन्सिला घुसवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. घटना गंभीर असून डाॅक्टरांनी तिच्या नाकातून ही पेन्सिल कशी बाहेर काढली याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
लहान मुलांचे जग हे मस्तीच्या विश्वात रंगलेलं असतं. इथे ते कधी स्वत:च्या जीवीलाही धोका निर्माण करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मुलीने खेळतीना चुकून आपल्या नाकात पेन्सिल घुसवली, ज्यानंतर तिच्या नाकपुड्या पूर्णपणे बंद झाल्याचे व्हिडिओत दिसून येते. मुलीच्या आईने मुलीला पाहताच ती अस्वस्थ असल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिच्या नाकातून रक्तस्त्रावही होत होता. आईला भिती वाटली आणि तिने तातडीने मुलीला डाॅक्टरांकडे नेले. काळजीपूर्वक पाहताच तिच्या नाकात काहीतरी अडकल्याचे त्यांच्या ध्यानात आले, ज्यानंतर डाॅक्टरांनी फार सफाईने मुलीच्या नाकात अडकलेली पेन्सिल बाहेर काढली. ही घटना पालकांना लहान मुलांवर बारकाईने लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
ती एक गोष्ट अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले… भक्तांची चिंता वाढली, नक्की घडलं काय? Video Viral
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. याला @yo_yo_nobita108 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आजकाल मुले खूप धोकादायक होत चालली आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चला ती मुलगी ठीक आहे, देवाचे आभार” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजकालची मुलं त्यांच्या पालकांचा त्रास फार वाढवत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






