Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, टायटॅनिकच्या दुर्घटनेला ११४ वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने बीबीसीच्या मेड ऑफ हिअर अंतर्गत एक उपक्रम राबवण्यात आला होता. ३० मार्च रोजी हा ड्रोन शो पार पडला. यानंतर हा शो टेलिव्हीजनवर प्रसारित झाला होता. हा शो बीबीसीच्या टायटॅनिक सिंकस टुनाइट या भागांच्या माहितीपटावर आधारिक आहे. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याला नेटकऱ्यांकडून प्रचंड वाह वा मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पॉल रॉस या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pauloross_ या अकाउंटवर शेअर केला आहे. यामुळे या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने हे खूप अद्भुत आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका वाव अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने सो इट्स गोस्ट शीप असे म्हटले आहे. या व्हिडिओने लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकले आहे. लोकांना इतिहासातील एक घटना जिवंत झाल्यासारखे वाटत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






