डोनाल्ड ट्रम्प झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
शि जिनपिंगच्या भाषणादरम्यान ट्रम्प झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल
APEC शिखर संमेलनादरम्यानची घटना असल्याचे आले समोर
सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी धरले धारेवर
Donald Trump: सध्या चीनमध्ये शेनझेन शहरात APEC म्हणजेच आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित राहिले आहेत. मात्र या परिषदेदरम्यान एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आपले प्रास्ताविक निवेदन देत असताना डोनाल्ड ट्रम्प झोपले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग निवेदन देत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पडोळे बंद करून बसले असल्याचे दिसून येत आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प झोपले असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. सोशल मिडियावर ट्रम्प यांच्यावर टीका देखील केली जात आहे.
शेनझेन येथे पार पडत असलेल्या APEC शिखर परिषदेच्या मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग परिषदेची सुरुवात करताना आपले निवेदन देत होते. त्याच दरम्यान कॅमेरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे वळला. त्यामध्ये ते डोळे बंद करून बसल्याचे दिसून आले. हा प्रसंग थेट टीव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात आला. त्यानंतर काही वेळातच या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जाऊ लागल्या. ट्रम्प डोळे बंद करून बसल्याचे दृश्य समोर आल्याने नेटिझन्स आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले.
चीनमधील शेनझेन येथे सुरू असलेल्या APEC शिखर परिषदेदरम्यान डोळे बंद करून बसलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ते विरोधक आणि टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘सगळे जण परिषदेसाठी जातात आणि ट्रम्प APEC मध्ये डुलकी घ्यायला जातात.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील ही त्रिपक्षीय चर्चा शेनझेनमध्ये होत आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या तिन्ही देशांचे सर्वोच्च नेते पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्रित आले आहेत. या बैठकीतून जागतिक राजकारण, व्यापार आणि भू-राजकीय पातळीवर कोणती नवी समीकरणे आकार घेतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






