काय बोलावं आता! दात दुरुस्त करायचेत म्हणून भावाने दगड कापण्याची मशीन घेतली अन् थेट दातांवर... दृश्ये तुमचाही उडेल थरकाप
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणि थक्क करणारे व्हिडिओज शेअर केले जातात. यातील दृश्ये कधी आपल्याला हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देतात. इथे लोक नवनवीन स्टंट्स, जुगाड, डान्स अशा अनेक गोष्टी शेअर करतात. बऱ्याचदा यातील दृश्ये आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात आणि आताही असेच एक नवीन दृश्य इथे व्हायरल झाले आहे ज्याने इंटरनेटवर सर्वांनाच हादरवून सोडले आहे. वास्तविक व्हिडिओमध्ये एक माणूस मुलाचे खराब दात दुरुस्त करण्यासाठी दगड फोडण्याच्या मशीनचा वापर करताना दिसून आला आहे. हा धोकादायक पराक्रम आता युजर्सना चांगलाच हादरवत असून व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. चला यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एक मुलगा ज्याचे वाकडे दात आहे तो डेंटिस्टकडे न जात त्याने आपल्या मित्राकडे याची मदत मागितली आहे. मग काय आता मित्राने दात ठीक करण्यासाठी नवीन जुगाड शोधून काढला. त्याने काय केले तर… दातांना पुन्हा सरळ, योग्य आकार देण्यासाठी त्याने हातात दगड कापण्याची मशीन घेतली आणि या यंत्राने तो दातांना योग्य शेप देऊ लागला. व्हिडिओमध्ये मुलाने आपले तोंड उघडे केले असून एक व्यक्ती हातात मशीन घेऊन ती मशीन त्याच्या दाताला लावताना व्हिडिओत दिसून आले आहे. व्हिडिओतील हे दृश्य खरंतर फार धोकादायक असून असे जीवघेणे प्रकार आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. दातांना दुरुस्त करण्यासाठी तरुणाने ज्या मशीनचा वापर केला आहे ती मशीन इतकी धारदार आहे की जरा जरी त्याचा हात चुकीच्या दिशेने हलला तर मुलाच्या चेहऱ्याचा भाग कापला जाऊ शकतो. दातांवर दगड कपणाऱ्या मशीनचा वापर करण्यात आल्याचे पाहून युजर्सही आता हादरून गेले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @mission_par_hu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नवीन टेक्नॉलॉजीया” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, आयुष्याशी खेळत आहेत मग बोलतील की देवाची चुकी आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे पाहून तर सर्वच डॉक्टर कोमामध्ये जातील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.