(फोटो सौजन्य: Instagram)
भूल भुलैया हा चित्रपट बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि सर्वात गाजलेला चित्रपट आहे. चित्रपटाची जादू इतकी जबरदस्त आहे की आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की लोक आवडीने हा चित्रपट पाहू लागतात. चित्रपटातील अनेक भूमिका या प्रचंड गाजल्या आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अशीच चित्रपटाची गाजलेली भूमिका म्हणजे छोटा पंडित, ही भूमिका अभिनेता राजपाल यादव यांनी फार सुंदररित्या निभावली. त्यातच आता सोशल मीडियावर एक गोड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यात एका चिमुकल्याने छोट्या पंडितचा क्युट लूक केल्याचे दिसून आले आहे. चला व्हिडिओत काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गोंडस मुलगा ‘भूल भुलैया’ चित्रपटातील छोटे पंडितच्या सुंदर वेशात दिसून येत आहे. मुलाने चित्रपटातील पात्राप्रमाणेच त्याच्या शरीरावर लाल सिंदूर लावला आहे. त्याने बनावट मिशाही बनवल्या आहेत. तसेच, त्याने अँटेनासारखा गुच्छ असलेला गोंडस केसांचा पट्टा घातला आहे.याशिवाय, छोटू पंडितने गळ्यात फुलांचा हार आणि रुद्राक्ष घातलेला आहे. त्याला पाहून तो छोट्या पंडितचा एक नवीन व्हर्जन असल्यासारखेच वाटतं आहे. व्हिडिओतील चिमुकल्याचा हा लूक आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्याने आता सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक व्हिडिओवर गोड प्रतिक्रिया देऊन त्याचा या लूकची चांगलीच प्रशंसा करत आहेत.
दरम्यान चिमुकल्याचा हा व्हिडिओ @itsme_aaviii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, हा किती क्युट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छोट्या पंडितचे सर्वात क्युट व्हर्जन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूपच गोंडस, हा व्हिडिओ पाहून तर राजपाल यादव देखील खुश होतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.