(फोटो सौजन्य: Instagram)
हत्ती हा जंगलातील एक विशालकाय प्राणी आहे. जंगलातील सर्वात शांत प्राण्यांमध्ये तो मोडला जातो. आपल्या शक्तीचा कधीही बडेजाव न करणारा हत्ती माणसांमध्येही फार प्रेमाने वावरतो आणि म्हणूनच अनेक ठिकाणी हत्ती सारख्या विशाल प्राण्याला पाळले जाते. हत्तीचे अनेक गोड व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आले आहे अशातच त्याच्या उदारतेचे दर्शन घडवणारा आणखीन एक सुंदर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यात हत्तीने एका चिमुकल्याची मदत करून त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याचे दिसून आले. हत्तीच्या या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले असून लोक हत्तीच्या उदारतेचे आता भरभरून कौतुक केले जात आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यात एक लहान मुलगा प्राणीसंग्रहालयातील हत्तींच्या पिंजऱ्यात चुकून पडला आहे. त्याला असे पडलेले पाहताच वर उभे असलेले सर्व लोक घाबरतात आणि त्याला वाचवण्यासाठी धडपड करू लागतात पण तितक्यातच एक हत्ती हुशारीने तिकडे येतो आणि खाली पडलेल्या मुलाला आपल्या सोंडेने वर उचलत त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करतो. हत्ती सारख्या प्राण्यामध्येही माणुसकी शिल्लक आहे आणि त्याने उचललेले हे मदतीचे पाऊल खरोखर प्रशंसेस पात्र आहे. लोकांना हे दृश्य इतके आवडले की त्यांनी लगेच आपल्या फोनच्या कॅमेरात त्याला कैद करून हे दृश्य सोशल मीडियावर शेअर केले. व्हिडिओ पाहताच युजर्स हत्तीच्या उदारतेवर चांगलेच खुश झाले असून वेगाने हा व्हिडिओ आता शेअर केला जात आहे.
हत्तीचा हा सुंदर @jain29859 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बस कर भावा एआय ने सगळीकडे कहर माजवला आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे किती गोड आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.