किंग कोब्राला पाहताच चावताळल्या कोंबड्या, विषारी प्राण्याला चोचीत पकडलं अन् चावून चावून खाल्लं; थरारक Video Viral
साप हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. त्याच्या विषारी फणाने तो भल्याभल्यांची हवा टाइट करतो. अहो याच्या विषाची फक्त प्राण्यांनाच काय तर माणसांमध्येही मोठी दहशत आहे. सापांच्या प्रजातीतील एक म्हणजे किंग कोब्रा! याला पाहताच जंगलाचा राजाही उलटे पाय धरून पळू लागतो पण आता मात्र सोशल मीडियावर सर्वांना धक्का देणारे दृश्य व्हायरल झाले आहे ज्यात किंग कोब्राची वाईटरित्या शिकार झाल्याचे दिसून आले आहे आणि यातही आणखीन एक मुख्य गोष्ट म्हणजे, ही शिकार कुणी मोठा प्राणी नाही तर चक्क दोन कोंबड्या मिळून त्याची शिकार करताना दिसून आल्या आहेत. कोंबड्यांची किंग कोब्राची शिकार केल्याचे हे दृश्य दुर्लभ आणि आश्चर्यचकीत करणारे असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, दोन कोंबड्या एका लहान किंग कोब्राला टकमक पाहत आहे. यावेळी किंग कोब्राही त्यांच्याकडे पाहतो आणि सुरक्षेसाठी आपला फणा पसरून त्याला डंक मारण्याचा प्रयत्न करतो. पण कोंबड्यांमध्ये एकजूट असल्याने त्या काही कोब्राला घाबरत नाहीत आणि त्याच्याकडे बघत त्याची शिकार करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. अशातच पुढच्या क्षणी त्यांना तो योग्य क्षण मिळतो आणि क्षणाचाही विलंब न करता एक कोंबडी आपल्या चोचीत कोब्राला पकडते. साप एकीकडे जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण दोन्ही कोंबड्या आपल्या चोचीने त्याला टोचे मारत त्याची शिकार करतात. कोंबडी ही एक सामान्य प्राणी आहे जिचे अनेक प्राण्यांद्वारे शिकार झाल्याचे दिसून आले आहे पण कोंबडीने कधी कोणत्या प्राण्याची शिकार केल्याचे दृश्य आजवर कधीही कुठे दिसले नाही. शिकारीचे हे अनोखे दृश्य आता अनेकांना थक्क करत आहेत. कोंबड्यांच्या हातून किंग कोब्राचा झालेला हा शेवट आता सर्वांनाच अचंबित करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @vlogger_aditya_06 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता कोंबडीपासूनही वाचून राहावं लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “क्या किंग कोब्रा बनेगा रे तू” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोंबड्या तर खतरनाक निघाल्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.