
इतका भयानक मृत्यू कुणाच्याही वाटेला येऊ नये! कचरागाडी आणि कारच्या मध्ये जाऊन चिरडले गेले दोन मजूर; Video Viral
आताच्या जगात मृत्यूचे प्रमाण इतके वाढले आहे की, कधी कुणाचा शेवट होईल ते सांगता येत नाही. अनेकदा कल्पना नसताना वाईट अवस्थेत मृत्यू भेट देतो आणि अशीच काहीशी घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे. घटना दोन कामगारांसोबत घडून आली असून त्यांचा वाईटरित्या यात शेवट झाला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून यात एक कचरा गाडी आणि ट्रक यांच्या मध्ये जोरदार धडक झाल्याचे दिसून येते. परिणामी या धडकेत घात होतो दोन व्यक्तींचा… ही सर्व घटना स्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचीच क्लिप आता इंटरनेटवर शेअर केली जात आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
घटना नेमकी कुठली आहे याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. व्हिडिओमध्ये, रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन एक कचरा गाडी जाताना दिसून येते. बाजूला असलेल्या कचराकुंडीतून कचरा उचलण्यासाठी गाडी कडेला थांबते आणि दोन व्यक्ती कचराकुंडीतील कचरा गाडीत टाकण्यासाठी बाहेर येतात. ते कचरा गाडीत टाकत असतानाच मागून एक कार भरधाव वेगाने त्यांच्या दिशेला येते आणि कचरागाडीला जोरदार धडक बसते. या धडकेत दोन्ही मजूर वाईटरित्या चिरडले गेल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. या अपघातात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि कचऱ्याचा डबाही तुटला. दोघेही वाचले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले असण्याची शक्यता आहे.
🖤👒😑 pic.twitter.com/GQwtU2Lz44 — maldad y obscuridad (@arauj12320) October 24, 2025
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @arauj12320 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते मुद्दाम केले आहे, असे दिसत आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कचरा उचलणे हे इतके धोकादायक काम आहे हे कोणाला माहित होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चूक पूर्णपण कार चालकाची आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.