(फोटो सौजन्य: X)
महाभारत युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र धारण केल्याची कथा तुम्ही ऐकली असेल. त्यांनी राजा श्रीगल आणि शिशुपाल यांना मारण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर केला होता. अनेक पौराणिक कथांमध्ये, नाटकांमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये तुम्ही हे सुदर्शन चक्र हवेत फिरून पुन्हा परत येताना पाहिलं असेल. आता सुदर्शन चक्राची ही कमाल आपण कथांमध्ये ऐकली आणि चित्रपटांमध्ये पाहिली असेल पण तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही हे दृश्य घडताना पाहिले आहे का? हे अनोख दृश्य काकांनी सत्यात उतरवून दाखवलं आहे आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात काका सुदर्शन चक्राप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला हातात पकडून उभे असातात आणि पुढच्याच क्षणी ते हवेत हे चक्र फेकतात. यानंतर आपल्याला हवेत हे चक्र गोलगोल फिरताना दिसून येते. अवकाशात फेकलेली ही गोष्ट आता कुठेतरी पडेल असा सर्वांचा अंदाज असतो परंतु घडते काही वेगळेच. अवकाशाची एक फेरी मारुन झाल्यानंतर हे चक्र पुन्ही काकांच्या हातात परतते. काका आपल्या बोटांमध्ये त्याला पकडतात, त्यांचा अंदाज फार जबरदस्त असतो. हे चक्र पुन्हा परतले कसे याची कल्पना कुणालाच नाही पण हे दृश्य पाहून सर्वांनाच महाभारतातील सुदर्शन चक्राची आठवण झाली असावी, एवढं नक्की. लोक हे दृश्य पाहून चांगलेच थक्क झाले आहेत.
This is how Sudarshana chakra works… pic.twitter.com/xES7i64KYT — 🚩P r a d e e p 🚩 (@pRRRadeep) October 23, 2025
दरम्यान हा व्हिडिओ @pRRRadeep नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अशाप्रकारे सुदर्शन चक्र काम करते’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे की एआय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे काय आहे? हे कसे शक्य आहे? यामागचं तर्कशास्त्र काय?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अतिशय सुंदर रचना”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






