Two man fight over seat in Mumbai Local Train Video goes viral
मुंबई लोकलही मुंबईच्या लोकांची जीवनवाहीनी आहे. रोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. मुबंईल लोकलचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स रिल बनवतानाचे, तर कधी महिलांच्या कुंकवाच्या कार्यक्रमांचे, तर कधी कपल रोमान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा प्रवासी संध्याकाळाच्या वेळी ट्रेनमध्ये जाताना भजन, गाणी अशा वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. विशेष करुन महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.
नेमकं काय घडलं?
पण सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन पुरुषांमध्ये जबर मारहाण सुरु आहे. दोन्ही पुरुष एकमेकांना सटासट लाथा, बुक्या मारताना दिसत आहेत. दोघेही अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठलेले आहे. ही घटना मुंबईच्या हार्बर रेल्वेलाइन महामार्गावर घडली आहे. दोन्ही प्रवाशांमध्ये सीटवरुन भांडण सुरु झाले होते, मात्र रागाच्या भरात दोघेही आजूबाजूची परिस्थितीचे भान विसरले आहेत. सुरुवातील दोघांमध्ये एकाच सीटवर बसण्यावरुन शीवागाळ सुरु झाला होता. पण बघता बघात ही भांडण मारामारीपर्यंत पोहोचली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकजण व्हिडिओ पाहून हैराण झाले आहे. हा व्हिडिओ नवराष्ट्राच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर तुम्ही पाहू शकता.
बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात एक्सवर, इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, हे जरा नवीनच पाहायला मिळाले, तर दुसऱ्या एकाने आज पुरुषांच्या अंगात महिला घुसल्या वाटतं, असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने नक्कीच घरी बायकोसोबत भांडण झाले असणार आणि राग इथे काढला असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान राडा घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.