
पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सदर कोतवालीच्या सीसीटीएनएस कक्षात अधिकारी ड्यूटीवर तैनात होता. तो आपल्या खुर्चीवर बसून काम करत होता आणि तेव्हाच एक महिला कर्मचारी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना किस करते. यावेळी दोघांनीही पोलिसांची वर्दी घातलेली नसते आणि महिला कर्मचारी गळ्यावर हात ठेवून खुर्चीवर बसलेल्या कर्मचाऱ्यासोबत गप्पा मारु लागते. कीहीवेळाने अधिकारी खुचीवरुन उठून रजिस्टर चेक करत दुसऱ्या टेबलवर जाताना दिसतो तर महिला कर्मचारीही त्याच्या मागे मागे त्या दिशेने जाताना दिसते. हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी इंटरनेटवर शेअर करण्यात आला ज्यानंतर व्हिडिओची पडताळणीही करण्यात आली.
🚨 Orai, UP: Police thane mein hi uniform ki izzat taar-taar!
Clerk aur mahila constable ka video viral — SP ne constable ko suspend kar diya, lekin sawaal uthta hai…
Kya sirf constable galat thi? Clerk ka kya? 🤔#UPPolice #Orai #ViralVideo #UniformDignity pic.twitter.com/GCz8y5JSdZ — Mohit SY (@imohitray_) June 25, 2026
दोघांमधील हे वैयक्तिक संभाषण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने खळबळ उडाली असून कामाच्या ठिकाणी असे प्रकार घडणे लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहे. माहितीनुसार, घटना समोर येताच पोलीस अधीक्षकांनी सर्कल ऑफिसरला या घटनेचा तपास करण्याचे काम सोपवले. प्राथमिक तपासात हा व्हिडिओ खरा आहे हे समजले ज्यानंतर कर्मचारी अरविंद यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. दरम्यान चूक दोघांची असताना निलंबन फक्त एकाचे का असा प्रश्न नेटकऱ्यांद्वारे उपस्थित केला जात आहे. घटनेचा व्हिडिओ @imohitray_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.