
शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral
अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral
काय आहे प्रकरण?
ही घटना भटवाडी ब्लाॅकमधील एका सरकारी शाळेत घडून आली. विनयभगांमुळे विद्यार्थीनीला मानसिक धक्का बसला असून आरोपी एनसीसी शिक्षकाला शिक्षा विभागाकडून निलंबित केले आहे. मुलीचा विनयभंग करणाऱ्याला शिक्षकावर फक्त मारहाण करण्यात आली नाही तर कायदेशीररित्या त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी भटवाडी ब्लाॅकमधील एका सरकारी शाळेतील विद्यार्थीने शिक्षक आणि एनसीसी अधिकारी असणाऱ्या व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप लावला. शिक्षकाच्या या कृत्यामुळे मुलगी मानसिकदृष्ट्या खचली आहे. घटनेची माहिती मिळताच पिडितेचे वडिल बुधवारी मनेरी पोलिस ठाण्यात पोहचले. त्यांनी पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार सांगत शिक्षकावर वेळीच कारवाई करुन मुलीला न्यान मिळवून देण्याची मागणी केली.
कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला आहे याची माहिती मिळताच काही स्थानिक लोक एकत्र आले आणि त्यांनी मिळून शिक्षकाला घेरले. सर्वांनी पहिल्यांदा शिक्षकाला बेदम मारहाण केली आणि मग महिलांनी चप्पलांनी शिक्षकावर हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तत्काळ एफआयआर नोंदवला आहे. अधिकाऱ्याविरोधात पाॅक्सो कायद्यासोबतच अन्य संबंधित कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.