(फोटो सौजन्य: X)
कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
कुठे दिसली गुलाबी डाॅल्फीन?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही गुलाबी डॉल्फिन नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ दिसून आली आहे. खंरतर कथितरित्या गुलाबी डाॅल्फीनला अमेरिकेच्या कॅरोलिना सुमुद्रकिनाऱ्यावर पाहिलं जातं. गुलाबी रंगाची ही डाॅल्फीन दुर्मिळ असून तिचे दर्शन घडणे म्हणजे नशीबाचीच गोष्ट. गुलाबी डाॅल्फीनचे फोटोज समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये मात्र वेगळाच उत्साह दिसून आला. अनेकांनी डाॅल्फीनच्या अनोख्या आणि आकर्षक रंगाचे काैतुक केले तर काहींनी हे एआय तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला. खरं सत्य हे आहे की, फोटोत दिसून आलेली गुलाबी रंगाची डाॅल्फीन खरी असून तिचे दिसणे फार दुर्मिळ मानले जाते.
गुलाबी रंगामागची कथा
वास्तवात जन्माच्या वेळी या डॉल्फिन गुलाबी नाही तर राखाडी रंगाच्या असतात. तथापि, जसजसे त्यांचे वय वाढते, तसतसे त्वचेवरील रक्तवाहिन्या जवळ आल्यामुळे आणि सूर्यप्रकाशामुळे त्यांचा रंग गुलाबी किंवा पांढरट-गुलाबी होऊ लागतो.
Rare pink Dolphin spotted off the coast of North Carolina! pic.twitter.com/qTQQCgZvU3 — Facts matter (@1800factsmatter) June 18, 2024
सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
हा व्हिडिओ @1800factsmatter नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन दिसून आला!’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “गुलाबी डॉल्फिन नावाची एक प्रजाती अस्तित्वात आहे. पण ते निळ्या महासागरात नाही, तर ॲमेझॉनमधील गोड्या पाण्यात राहतात!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे व्वा, गुलाबी रंगाची डाॅल्फीन मी पहिल्यांदाच पाहिली”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “गुलाबी डॉल्फिनचे अस्तित्व असले, तरी ते केवळ गोड्या पाण्यातच जगू शकतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






