रीलसाठी तरूणाने केले मरण्याचे नाटक
सध्या इंटरनेटच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक चित्रविचित्र स्टंट करतात. असे लोक स्वत:चा जीव धोक्यात घालतातच पण यामुळे इतरांचा देखील जीव धोक्यात येतो. आत्तापर्यंत तुम्ही बाईक स्टंट करताना किंवा वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारून स्टंट करतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण एका तरूणाने सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी एक वेगळाच स्टंट केला आहे.
उत्तर प्रदेशातील कासगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, रस्त्याच्या मधोमध पडून मृत्यूचे नाटक करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण रस्त्याच्या कडेला एका चौकाच्या मधोमध झोपला आणि मरण्याचे नाटक करू लागला. क्षणभर असे वाटते की प्रत्यक्षात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार तेथील उपस्थित लोकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांना सत्य समजताच या तरूणाला अटक करण्यात आली.
पोलिसांनी केली अटक
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावर पडलेला दिसत आहे, जणू त्याच्या जीव गेला आहे. तो अंगावर पांढरी चादर, नाकात कापसाचे बोळे, आणि हार घालून झोपलेला आहे. त्यावेळी रस्त्यावर वाहने व लोकांची गर्दी होती, मात्र या तरुणाच्या कृत्यामुळे तेथे गोंधळ उडाला. लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की त्या तरुणाचे काय झाले? अनेकांना हा अपघात झाल्याचे वाटू लागले म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता सत्य काही वेगळेच निघाले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून चौकशी केल्यानंतर या तरुणाने हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल करून रील काढण्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तरुणावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
व्हायकर व्हिडीओ
Reel क्या न करा दे…
उत्तर प्रदेश के जिला कासगंज में एक युवक ने चौराहे पर लेटकर मरने का ढोंग किया। पुलिस ने रीलपुत्र मुकेश कुमार को गिरफ्तार किया। pic.twitter.com/3JfDbIYYy0— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 15, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SachinGuptaUP या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘तरूणांना सोशल मीडियाचे वेड लागले आहे, अशा लोकांचे काउन्सलिंग करण्याची गरज आहे, तर आणखी एकाने म्हटले आहे की, या मुलांना मोबाईल दिला नाही पाहिजे आणि चांगले बदडून काढले पाहिजे, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, असला वेडेपणा पागल लोक देखील करत नाहीत.