फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जाते. तर अनेकवेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात की रडावे की हसावे कळत नाही. तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांचे डान्स रील्स तुम्ही पाहिले असतील. गुलाबी साडी गाण्यावर, तर आणखी कोणत्या वेगळ्या गाण्यावर तुम्ही डान्स रील्स पाहिले असतील. सोशल मीडिया हे अनेकांसाठी आपल्या कला दाखवण्याचे माध्यम बनलेले आहेत.
सध्या असाच एक शिक्षक-विद्यार्थ्याच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्तीसगढच्या ओपी जिंदल विद्यालयाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे मन जिंकले आहे. विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्याचा या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी शिक्षकाचे कौतुक केले आहे.
यूपी वाला ठूमका लगाओ…
व्हिडीओमध्ये गोविंदाच्या यूपी वाला ठूमका लगाओ गाण्यावर एक शिक्षक आणि विद्यार्थ्याने भन्नाट डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरूवातीला विद्यार्थी डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. नंतर त्याचे शिक्षक त्याला थांबवतात, आणि त्याच्यासोबत डान्स करायला येतात. दोघांनी मॅचिंग काळ्या रंगाचा शर्ट आणि पँट घातला आहे. या गुरु-शिष्य जोडीने मंचावर आग लावली आहे. दोघांनीही प्रत्येक डान्स स्टेपही अतिशय उत्तम प्रकारे केली आहे. त्यांचा डान्स पाहून तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीने टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
हे देखील वाचा – ढोलवर बसून डान्स करायला गेला अन्…; असे काही झाले की, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @iamadarshag नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत व्हिडीओला लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर सुमारे 10 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओवर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘सरांनी खरोखरच अप्रतिम डान्स केला आहे’, तर दुसरा एकाने लिहिले आहे की, ‘मी देखील अशा महाविद्यालयास पात्र आहे.’ तसेच आणखी एकाने म्हटले आहे की, ‘आमच्या वेळी असे शिक्षक का नव्हते.’ या शिक्षक-विद्यार्थी जोडीने अनेकांची मने जिंकली आहेत.