
जंगलाच्या राजाची नवी हेअरस्टाईल! कुरळ्या केसांच्या वाघाला पाहून सर्वच पडले प्रेमात... म्हणाले, "किती क्युट आहे हा"; Video Viral
जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे, त्याच्या ताकदीमुळे त्याला राजाची उपमा देण्यात आली आहे. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज आपण आजवर सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील. या व्हिडिओजमधील सिंहाचे थरारक रूप पाहून सर्वांनाच धडकी भरते पण नुकताच सिंहाच्या नव्या हेअरस्टाईलचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसून आला आहे, ज्यात सिंह एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आला. यामध्ये सिंह कुरळ्या केसांमध्ये दिसला, होय आपण कधीही सिंहाला आजवर कुरळ्या केसांत पाहिलं नसेल पण त्याची ही नवीन हेअरस्टाईल आता यूजर्सना त्याच्या प्रेमात पाडत आहे. लोक सिंहाचा नवा लूक पाहून खुश झाले असून हा व्हिडिओ आता वेगाने शेअर करु लागले आहेत. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मेलिसा वादळात ढगात सापडले विमान; भयानक Viral Video पाहून अंगावर येतील शहारे
काय घडलं व्हिडिओत?
जंगलाचा राजा, सिंह, त्याची शाही चाल आणि सुंदर केसांसाठी ओळखला जातो. तथापि, सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक अलीकडील व्हिडिओ या सिंहाला इतरांपेक्षा वेगळे करतो. व्हिडिओमध्ये, एक सिंह जंगलात ऐटीत फिरताना दिसत आहे. परंतु त्याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कुरळे केस. सिंहांचे केस सामान्यतः सरळ असतात, परंतु या व्हिडिओमधील सिंहाची केशरचना खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याची ही नवीन हेअरस्टाईल यूजर्सना चांगलीच आवडली असून लोक अक्षरश: त्याच्या या नव्या लूकच्या प्रेमात पडले आहेत. असे मानले जाते की ही कुरळी हेअरस्टाईलहवेतील आर्द्रता आणि पावसात भिजल्यानंतर हवेत सुकल्याने असू शकते.
कुरळ्या केसांच्या सिंहाचा हा व्हिडिओ @silent_whispers.photography नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो खूप गोंडस आहे. मला अजूनही त्याच्यात त्याच्या शावकाचा चेहरा दिसतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो या हेअरस्टाईलमध्ये सुंदर दिसत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो खूपच देखणा दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाला यासाठी मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.