बिहार पोलिसांचे रेस्टोरंटमध्ये जेवायला गेलेल्या भाऊ बहिणी सोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला (फोटो - सोशल मीडिया)
Bihar Police Hotel Viral Video: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये बिहार पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील दिसून येत आहे. विरोधकांनी बिहारमधील व्यवस्थेवर टीकास्त्र डागले आहे. तर सत्ताधारी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र दरम्यान, बिहार पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये जेवायला गेलेल्या बहीणीवर भावावर दादागिरी करत कोण रे ही तुझी असे विचारुन पोलिसांनी त्रास दिला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस हे नक्की रक्षक आहेत का असा प्रश्न उपस्थित केला.
बिहार पोलिसांनी जेवणासाठी गेलेल्या बहीण -भावासोबत गैरवर्तन केले. कटिहारमधील एका हॉटेलचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार भाऊ-बहीण रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. त्यावेळी पोलीस पथक नियमित तपासणीसाठी तिथे पोहोचले. एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणाला सोबत असलेल्या युवतीबद्दल विचारलं. जेव्हा त्याने ती आपली बहीण असल्याचं सांगितलं, तेव्हा अधिकाऱ्याने उद्धटपणे प्रतिक्रिया दिल्यामुळे वाद वाढला. ‘बहीण आहे.. तर असं काय बोलतोस.. विचारुही शकत नाही का’ असं पोलीस म्हणाला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीं व्यक्तीने पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत सांगितले. ते म्हणाले की, “पोलीस अधिकाऱ्यांचा बोलण्याचा आणि वागण्याचा सूर अनावश्यकपणे आक्रमक होता. यामुळे रेस्टॉरंटमधील इतर लोकांचे देखील लक्ष गेले.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आधी ते दोघे भाऊ-बहीण चिंतेत दिसतात. नंतर ते दटावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारताना दिसतात, मात्र इतर पोलीस शांत उभे होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला. यानंतर बिहार पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
This incident occured yesterday night when we went for family dinner in barsoi bihar which falls under katihar dist. So we cant even take our sister for family dinner if its election time in bihar? @ECISVEEP @KatiharSp @katiharpolice @narendramodi @NitishKumar #BiharElection2025 pic.twitter.com/gqCPXrDnON — yash agrawal (@yash1524) October 25, 2025
नागरी सुरक्षा अशा प्रकारे काम करते का?
सोशल मीडियावर बिहार पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “भाऊ आणि बहीण एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसले होते तेव्हा एक धूर्त पोलिस अधिकारी आला आणि त्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले. सीसीटीव्हीमुळे संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली. नागरी सुरक्षा अशा प्रकारे काम करते का?” असा प्रश्न नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हिडिओ शेअर करताना नेटकऱ्याने लिहिले की, “जर बिहारमध्ये निवडणुकीची वेळ असेल तर आम्ही आमच्या बहिणीला कुटुंबासोबत जेवणासाठीही घेऊन जाऊ शकत नाही.” लोकांच्या संतापानंतर, कटिहार येथील पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) यांनी गैरवर्तनाची पुष्टी करणारी चौकशी सुरू केली, त्यानंतर त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट करुन बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे.
एक सी0सी0टी0वी0 का वायरल वीडियो प्राप्त हुआ, जिसमें दिनांक-24.10.2025 को थानाध्यक्ष बारसोई द्वारा बारसोई रास चौक स्थित BR-11 रेस्टोरेंट में बैठे कुछ व्यक्तियों के साथ बकझग की जा रही है। इस मामले की जाॅच पुलिस उपाधीक्षक,(मुख्यालय) कटिहार द्वारा कराई गई। (1/3) pic.twitter.com/yHpWeEMbJ7 — Katihar Police (@SpKatihar) October 27, 2025






