
वय गेलं पण उत्साह तितकाच कायम...! 80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
हे आजोबा हरियाणातून आलेले असून त्यांचे वय ८० वर्षे आहे. वृद्धत्वात आपली हाडे ठिसूळ होऊ लागतात आणि उत्साह कमी होतो. पण व्हिडिओत आजोबा मात्र भारीच उत्साहात दिसून आले. त्यांनी १५,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून सोशल मीडियावर खळबळ उडवून टाकली. खरंतर आजोबांचा नातू त्यांना हा खेळ खेळवण्यासाठी घेऊन आलेला असतो. चेहऱ्यावर भितीची एकही रेष न आणता आपले साहस दाखवत ते अवकाशात झेप घेतात आणि हसत हसत लँडिंग करतात. जेव्हा त्यांचा नातू त्यांना विचारतो की, तुम्हाला भिती नाही वाटली का? तेव्हा ते छाती ताठ करुन सांगतात की अजिबात नाही, मी हरीयाणाचा आहे. व्हिडिओतील आजोबांचा उत्साह आणि त्यांचा साहस पाहून आता यूजर्स त्यांच्या हिमतीची प्रशंसा करत आहेत. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयापासून अडवू शकत नाही, हे यातून सिद्ध होते.
ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral
आजोबांच्या स्कायडायव्हिंगचा हा व्हिडिओ @ankitranabigmouth नावाच्या इंस्टाग्रामवरुन अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हरीयाणा ऑन टॉप” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबांना मानलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजोबा-नातवाची ही जोडी बेस्ट आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.