(फोटो सौजन्य – Instagram)
ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, किंग कोब्रा सापाची शिकार करताना दिसून आला. त्याने आपल्या तोंडात सापाला पकडले असून एका नूडल्यप्रमाणे तो सापाला गिळण्याचा प्रयत्न करत असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अवघ्या काही सेकंदातच तो सापाला गिळंकृत करुन टाकतो. एका लाकडी पेटीच्या आत किंग कोब्रा बसलेला असतो आणि जमिनीवर पडलेल्या सापाला आपल्या तोंडात पकडून तो आत खेचण्याचा, त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. किंग कोब्राचा ७५ टक्क्यांहून अधिक आहार हा इतर सापांवर अवलंबून असतो. ते लहान अजगरांना आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतात. हा धोकादायक साप १०-१२ फूट लांबीपर्यंतच्या भक्ष्याला सहज गिळू शकतो.
हा व्हायरल व्हिडिओ @jayprehistoricpets नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला डेंजर नूडल्स खूप आवडतात, त्यामुळे साप खाताना पाहणे खूप छान आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला पचायला किती दिवस लागतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो कोणत्या सापाला खात आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






