Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी सर्वात मोठी योद्धा आईच असते…! डोक्यावर पोतं आणि कमरेवर लेकराला घेऊन करु लागली प्रवास; भावनिक Video Viral

Emotional Video : आईचं प्रेम म्हणजे संघर्षातही उभं राहणारं सामर्थ्य! डोक्यावर पोत्याचा भार अन् कंबरेवर लाडाचं लेकरु... दोन्ही गोष्टी सांभाळत महिला भल्यामोठ्या पायऱ्यांवरुन चालताना दिसली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 09:11 AM
शेवटी सर्वात मोठी योद्धा आईच असते...! डोक्यावर पोतं आणि कमरेवर लेकराला घेऊन करु लागली प्रवास; भावनिक Video Viral

शेवटी सर्वात मोठी योद्धा आईच असते...! डोक्यावर पोतं आणि कमरेवर लेकराला घेऊन करु लागली प्रवास; भावनिक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • आईच्या कष्ट आणि ममतेचं हृदयस्पर्शी दृश्य सोशल मीडियावर व्हायरल.
  • जड ओझं उचलतानाही मुलाची काळजी घेणारी आई पाहून लोक भावूक.
  • घटनेवर नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया; समाजव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित.
आईला मायेचं प्रतीक मानलं जातं. आपल्या संपूर्ण वाटचालीत आई नेहमीच आपल्या सोबत असते. ती मायेने कुरवाळते, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवते आणि वेळ पडली तर आपल्यासाठी ढाल बनून उभी देखील राहते. तुम्ही हिरकणीची ती कथा ऐकली आहे का? आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजण्यासाठी ती मोठ्या धैर्याने रायगड किल्ल्यावरुन खाली उतरली होती. आजही तिच्या ममतेची चर्चा होते. अशातच अलिकडे अशाच एका आईचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जी कणखरतेने अडचणींना मात देत आपल्या मुलाची काळजी राखताना दिसली. तिच्या डोक्यावर भलेमोठे पोते होते तर कंबरेवर चिमुकला बसला होता. मुलाला त्रास होऊ नये यासाठी पोत्याचा भार सांभाळत ती पायऱ्यांवर हळूच चढताना दिसली.

मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील

व्हायरल होत असलेली ही घटना लहान वाटत असली तरी त्यात त्याग, संघर्ष आणि ममतेचे प्रतिबिंब सहज झळकते. डोक्यावरील पोतं आणि कंबरेवर ठेवलेल्या बाळाची काळजी राखण्यासाठी तिला त्या क्षणी किती मेहनत करावी लागली असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. ही घटना फक्त तिचीच नाही तर तिच्यासारख्या अनेक कष्टाळू महिलांची कथा दर्शवते. घराची जबाबदारी सांभाळत, मुलाची काळजी घेणे फक्त एका आईलाच जमू शकते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक महिला डोक्यावर जड पोते घेऊन पायऱ्या चढताना दिसते. यावेळी तिच्या कंबरेवर तिचे लहान मुल शांतपणे बसलेले असते. प्रचंड वेदना होत असतानाही ती आपल्या मुलाची पुरेपुर काळजी घेते. हे दृश्य आपल्याला आईच्या सामर्थ्याचे दर्शन घडवून देते.

This is honestly beyond extraordinary, seeing her carry so much weight on her neck with a baby on her back while still climbing those stairs, it really shows how the strength of motherhood goes beyond what we can even imagine pic.twitter.com/5Ao5kYvb9a — Nikhil saini (@iNikhilsaini) April 29, 2026

700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स… नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral

हा व्हिडिओ @iNikhilsaini नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हे खरोखरच अत्यंत विलक्षण आहे. पाठीवर लहान बाळ असतानाही, गळ्यावर इतके प्रचंड ओझे पेलत तिला त्या पायऱ्या चढताना पाहणे; यातून हेच ​​सिद्ध होते की, मातृत्वाची शक्ती ही आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असते’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “भावा, ही काही ताकद नाही; तर तिचे आणि मुलांचे प्राण धोक्यात घालणे हा निव्वळ मूर्खपणा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक समाज म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत. कोणत्याही आईला आणि मुलाला यातून जावे लागू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही आपली अशी अवस्था आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral a mother carrying a sack on her head and a child at her waist viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील
1

मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील

700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स… नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral
2

700 गाड्या, लाउड स्पीकर अन् डान्सर्सना डान्स… नातवाने अनोख्या थाटात पार पाडले आज्जीचे अंतिम संस्कार; शवयात्रेचा Video Viral

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral
3

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

3 Idiots स्टाईलमध्ये स्पीच! आफ्रिकन विद्यार्थ्याच्या भाषणाने विद्यार्थी प्रेक्षक हसून लोटपोट, Video Viral
4

3 Idiots स्टाईलमध्ये स्पीच! आफ्रिकन विद्यार्थ्याच्या भाषणाने विद्यार्थी प्रेक्षक हसून लोटपोट, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.