Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! डोकं फुटलं तर डॉक्टरांनी टाक्यांच्या ऐवजी जखमेवर लावली स्टेपलर पिन; धक्कादायक घटनेचा Video Viral

Shocking Viral Video : गावच्या डॉक्टरांनी केला अजब-गजब उपचार. डोकं फुटलं म्हणून त्यावर टाके नाही तर चक्क स्टेपलर पिन लावून टाकली. घटनेचा व्हिडिओ आता सर्वांनाच गोधळात टाकत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 02:27 PM
अरे बापरे! डोकं फुटलं तर डॉक्टरांनी टाक्यांच्या ऐवजी जखमेवर लावली स्टेपलर पिन; धक्कादायक घटनेचा Video Viral

अरे बापरे! डोकं फुटलं तर डॉक्टरांनी टाक्यांच्या ऐवजी जखमेवर लावली स्टेपलर पिन; धक्कादायक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बिहारमध्ये जखमेवर टाक्यांऐवजी स्टेपलर पिन लावल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल.
  • व्हिडिओमध्ये व्यक्तीच्या डोक्यावर तीन पिन दिसत असल्याने चर्चेला उधाण.
  • घटनेनंतर उपचार पद्धतीवर प्रश्न, सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया.
आपल्याला कोणती दुखापत झाली की आपण ती ठीक करायला डाॅक्टरांजवळ जातो. डाॅक्टर आपली स्थिती बघून त्यावर योग्य ते उपचार करतात. अशातच आता अलिकडे डाॅक्टरांच्या अजब-गजब प्रकाराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. घटना बिहारची असून इथे एका व्यक्तीला डाॅक्टरांनी जखमेवर टाके बसवण्याच्या जागी चक्क स्टेपलर पिना बसवल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला व्यक्तीच्या डोक्यावर एक जखम दिसते ज्यावर उपचार करण्यात आले आहेत पण ते करताना त्या जखमेवर चक्क स्टेपरच्या पिना लावण्यात आल्या. चला या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, घटना बिहारच्या नवादा जिल्ह्यातील वारसालीगंज पोलिस स्टेशन परिसरात घडून आली आहे. व्हिडिओमध्ये एका माणसाच्या डोक्याला तीन स्टेपलर पिन चिकटलेले दिसतात. व्हिडिओ काढणारा माणूस जेव्हा त्या व्यक्तीला याविषयी विचारतो तेव्हा तो स्पष्ट करतो की, डोक्याला दुखापत झाल्यानंतर तो गावातील एका डाॅक्टरकडे जातो आणि डाॅक्टर हे कृत्य करतो. सहसा, अशा प्रकरणांमध्ये, डॉक्टर डोके टाके घालून जखम बरी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु या प्रकरणात मात्र काहीतरी वेगळाच प्रकार दिसून आला ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकले. या घटनेमुळे आता उपचार पद्धतींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हा व्हिडिओ @ShivaInSaffron नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘बिहारमधील एका डॉक्टरने केलेले धक्कादायक कृत्य समोर आले आहे. जखमी रुग्णाच्या डोक्याला टाके देण्याऐवजी त्याला स्टेपलर पिन देण्यात आली. ही घटना नवादा जिल्ह्यातील वारसालीगंज पोलीस स्टेशन परिसरात घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर उपचार पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि कारवाईची मागणी तीव्र झाली आहे.’

बिहार में एक डॉक्टर की हैरान कर देने वाली करतूत सामने आई है, घायल मरीज के सिर पर टांके लगाने की जगह स्टेपलर पिन लगा दिया गया; मामला नवादा जिले के वारिसलीगंज थाना क्षेत्र की बताई जा रही है, मामला सामने आने के बाद इलाज के तरीके पर सवाल उठ रहे हैं और कार्रवाई की मांग तेज हो गई है!! pic.twitter.com/98SKTdHeQB — 𝚂𝚑𝚒𝚟𝚊 📿 (@ShivaInSaffron) March 13, 2026

दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव, शेख सराईतील इमारत आगीत जळून खाक; भीषण घटनेचा Video Viral

व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अज्ञानाची पराकाष्ठा. भाऊ, जग पुढे गेले आहे, तुम्ही कुठे मागे पडला आहात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल, धाग्यासोबत अशाप्रकारचीही स्टिचिंग केली जात आहे, कदाचित ते स्टेपलर पिन नाही आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो आरक्षणातून डॉक्टर झाला असावा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral bihar doctor used stapler pins on head injury viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • bihar
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral
1

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
2

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप
3

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…
4

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.