(फोटो सौजन्य: X)
खडकाळ कड्यावर चालवायला घेतली सायकल; तोल गेला, खाली पडली अन् Viral Video रोखला सर्वांचा श्वास
नैऋत्य दिल्लीतील मटियाला परिसरातील मासळी बाजाराजवळील एका झोपडपट्टीत भीषण आग लागली असून, त्यात किमान ८० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दिल्ली अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री ११.५४ वाजता झोपडपट्टी आणि लगतच्या भंगार गोदामांमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाने घटनेची माहिती देताना सांगितले की, आग सुमारे चार एकरात पसरली होती. आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या . अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली गेली. सुरवातीली आग विझवण्यासाठी २३ अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पण आगीची भीषणता पाहता पुढे ही संख्या वाढवून २८ करण्यात आली. मागे देखील याच महिन्याच्या ७ तारखेला याच जागी आग लागली होती, असे डीसीपींनी नमूद केले. दरम्यान ही आग नक्की कोणता कारणावरुन लागली होती ते अद्याप स्पष्ट झालं नाही.
#WATCH | Delhi: A fire broke out in the Sheikh Sarai area at the Old Authority building. Multiple fire tenders were rushed to the spot immediately. Firefighting and rescue operations are underway. pic.twitter.com/jmyldOmG84 — ANI (@ANI) March 12, 2026
मृत्यूच्या 1 तासानंतर जिवंत झाला… परत आल्यावर व्यक्तीने सांगितलं ‘दुसऱ्या जगाचं’ रहस्य
या भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. रहिवाशांनी सांगितले की प्रशासनाने त्यांना अन्न किंवा पिण्याचे पाणी दिले नाही. दुसऱ्यांदा लागलेल्या या आगीत लोकांचे कपडे, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे अशा सर्वच गोष्टी जळून खाक झाल्या. आता त्यांच्याकडे राहण्यासाठी ना घर आहे ना पाणी.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






