
गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता बॉयफ्रेंड, घरच्यांनी पकडताच बिल्डिंगमधून उडी मारली अन् असा पळ काढला की... Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, टी-शर्ट आणि लुंगी घातलेला एक माणूस बिल्डिंगच्या खिडक्यांचा आधार घेत खाली उतरत आहे. आपल्याला पायऱ्यांवरुन काही लोक त्याला शोधत असल्याचे यात दिसते पण त्यांची नजर चुकवून व्यक्ती सराईतपणे एका खिडकीवरुन दुसऱ्या खिडकीवर उडी मारत असतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ‘व्यक्ती त्याच्या गर्कफ्रेंडला भेटायला घरी गेला होता पण तिच्या घरच्यांनी त्याला पकडलं’. प्रेमाची ही सत्वपरिक्षा पाहून आता अनेकांना हसू अनावर झालं आहे. अनेकांनी तरुणाचे पुढे काय झाले असेल यावर तर्क लावले. काहींनी म्हटले की, त्याला घरच्यांनी खूप मारलं असेल तर काहींनी म्हटलं की, तो यशस्वीपणे तिथून पळून गेला असेल.
Girlfriend se milane gaya tha ghar walo ne pakad liya 😭 pic.twitter.com/1vLra1qoCY — Vishal (@VishalMalvi_) December 11, 2025
दरम्यान हा मजेदार व्हिडिओ सध्या सर्वच प्लॅटफाॅर्मवर चांगलाच व्हायरल होत असून त्याला @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रेयसीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे मृत्यूशी टक्कर होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही तर मोठी चूक झाली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किती हाडं तुटली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.