(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन गरुड हवेत उडताना आणि त्यांची शिकार एकमेकांना देताना दिसून येतात. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की एक गरुड आकाशातून वेगाने उडत आहे, त्याने त्याच्या पंजात भक्ष्याला पकडलेले आहे. तो आकाशात भक्ष्याला घेऊन उडतच असतो तितक्यात तिथे दुसरा गरुड येतो आणि तो पहिल्या गरुडाच्या पंजातून भक्ष्याला आपल्या पंजात पकडतो. गरुडासारखा प्राणी जो आपल्या शिकाऱ्याला कधीही आपल्या पंजातून सोडत नाही हा यावेळी स्वतःच आपल्या भक्ष्याला दुसऱ्याला देत आहे हे पाहून सर्वच थक्क झाले.
एकमेकांना शिकार सोपवण्याचे हे दृश्य योगायोग नाही, तर गरुड असं अनेकदा करतात. खरं तर, मादी गरुड अनेकदा नर गरुडाकडून शिकार घेते जेणेकरून ती त्याला घरट्यात घेऊन जाऊ शकेल आणि पिलांना खाऊ घालू शकेल. याला फूड ट्रान्सफर किंवा एअर फूड पास असे म्हटले जाते. जिथे नर गरुड शिकार पकडतो आणि हवेत मादी गरुडाला देतो. यामुळे मादी गरुडाला वारंवार शिकार करावी लागत नाही आणि तिची ऊर्जा वाचते. त्या बदल्यात, मादी गरुड तिच्या घरट्याचे आणि पिलांचे रक्षण करते.
हा व्हायरल व्हिडिओ @sciencegirl नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते आकाशातील टीमवर्क आहे… प्रेम आणि जगणे, सर्व एकाच सुंदर झटक्यात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टीमवर्क स्वप्न साकार करतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ अवकाशात सामानाची डिलिव्हरी करतोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






