
कहरच! घरदार सोडून प्रेयसीसोबत लग्न करायला गेला अन् कोर्टात समजलं मुलीचं आधीच लग्न झालंय... हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
अजब-गजब! ‘या’ देशात लग्नआधी तोडले जातात वधूचे दोन दात; कारण जाणून व्हाल थक्क
काय घडलं व्हिडिओत?
करायला गेला एक अन् झालं भलतंच अशी घटना व्हिडिओत घडून आली ज्याने संपूर्ण कोर्ट हादरलं. एक प्रियकर आपलं कुटुंब आणि घर सोडून प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी कोर्टात दाखल होतो. तो आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक होतो पण इथेच त्याचा मोठा विश्वासघात होतो आणि एक अशी बातमी त्याच्या कानावर पडते ज्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. लग्नाचा नोंदणी करताना त्याला समजतं की तो ज्या मुलीशी लग्न करण्यासाठी आला होता ती आधीच विवाहित होती. आपली दिशाभूल झाली आहे हे लक्षात आल्याने त्याला धक्का आणि पश्चात्ताप होतो. व्हिडिओत आपला विश्वासघात झाला आहे हे समजताच व्यक्ती मोठमोठ्याने तिला जाब विचारताना दिसून येतो. त्याच्या बोलण्यात त्याला झालेलं दुःख स्पष्टपणे जाणवतं. तो वारंवार तिला त्या विश्वासघाताचा जाब विचारतो पण मुलीकडे काहीही उत्तर नसतं आणि स्तब्धपणे फक्त मान खाली घालून आपली चूक मान्य करते. दरम्यान ही घटना नेमकी कुठली आहे याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @commentvacha.0.2 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने शेअर केला जात आहे. यासहच अनेक युजर्सने आता व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एकदा इन्शुरन्स क्लेम झाल्यानंतर परत क्लेम करता येत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या पोराची काय हालत झाली आसन पण” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो नक्की काय बोलत आहे ते कळलंच नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.