(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस घोड्यावर बसून एका माॅलमध्ये एंट्री करताना दिसून येतो. यावेळी त्याच्यासोबत एक मुलगाही घोड्यावर बसलेला असतो. घोड्यावर बसून ते संपूर्ण मॉल फिरू लागतात. संपूर्ण मॉलमध्ये आश्चर्याचे वातावरण पसरलेले असते. मॉलचा स्टाफ देखील व्यक्तीला पाहून थक्क होऊन हे सर्व दृश्य पाहत असतो. घोड्याचे सुंदर रूप आणि व्यक्तीची राईड अनेकांना खुश करून जाते. व्हिडिओत एक महिला घोड्याजवळ जाऊन त्याला गोजरतानाही दिसते. एकंदरीतच व्यक्तीच्या या युक्तीने मॉल कर्मचाऱ्यांचा कपाळावर आठ्या आणल्या असल्या तरी ग्राहकांना मात्र काहीतरी नवीन पाहण्याचा आनंद दिला. युजर्सने मात्र व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी याला विनोद म्हटले, तर काहींनी ते बेजबाबदार म्हणून टीका केली.
हा व्हिडिओ @cowboyatheart82 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण ते ग्राहकांना आनंदी करते असे दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या घोड्याला अजिबात भीती नाहीये. व्वा, कल्पना कराल का? माझा घोडा डबक्यांना घाबरतो.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आज मी इंटरनेटवर पाहिलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






