
छोटुसा फ्रॉक, गळ्यात घातला नेकलेस अन् डोक्यावर फुलांचा गजरा... प्रेग्नंट डॉगीसाठी मालकाने केलं क्युट बेबी शॉवर, Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओची सुरुवात मालकांनी भारतीय परंपरेप्रमाणे श्वानाच्या चेहऱ्यावर हळद लावण्यापासून होते. त्यानंतर तिला निळ्या-पांढऱ्या रंगाचा सुंदर फ्रॉक परिधान करून फुलांच्या हारांनी सजवले जाते. संपूर्ण परिसर झेंडू आणि ताज्या फुलांनी नटवला असल्याने उत्सवाचे वातावरण अधिक खुलून दिसते. यानंतर मालक दीवा प्रज्वलित करून तिच्या आणि येऊ घातलेल्या पिल्लांच्या कल्याणासाठी शुभेच्छा व्यक्त करतात. शेवटी, मालक प्रेमाने तिचा पंजा धरून तिला सादर करताना दिसतात, जणू काही कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनाची आनंदवार्ता शेअर करत आहेत. संपूर्ण विधी कुत्र्याला कोणतीही असुविधा होऊ नये याची काळजी घेत पार पाडला गेला होता.
श्वानाचे हे अनोखे बेबी शॉवर पाहून युजर्स चांगलेच खुश झाले आहेत. मागे एका मांजरीच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. हे व्हिडिओ लोकांचे आपल्या प्राण्यांविषयीचे प्रेम व्यक्त करते. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @inkofjithin नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘होणारी आई’ असे लिहिण्यात आले असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती किती सुंदर दिसत आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला चांगले मालक भेटले आहेत” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “लोक कधी काय करतील ते सांगता येत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.