
आनंद इतका झाला की लोकांनी पोलीस अधिकाऱ्यालाही नाचवलं, कडेवर उचललं अन्... मजेदार Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात विश्वचषक विजयाची बातमी पसरताच शहरातील रस्ते जल्लोषाने भरले. तरुण, मुले, महिला आणि वृद्ध सर्वजण ढोल ताशांच्या तालावर नाचत रस्त्यावर उतरले. वाहतूक थांबली, पण कोणीही त्याची पर्वा केली नाही. दरम्यान, सुरक्षा सांभाळणारे पोलिस अधिकारी देखील आनंदी वातावरणात अडकले होते. व्हिडिओमध्ये एका अधिकाऱ्याला अचानक गर्दीने उचलून नेल्याचे दिसून येते. सुरुवातीला तो आश्चर्यचकित झाला, परंतु नंतर त्याने या गोष्टीचे वाईट मानले नाही तर आनंदाच्या या उत्साहात त्यानेही मजा लुटली. हे दृश्य इतके भावनिक आणि मजेदार होते की लोकांना ते मोठ्या प्रमाणात शेअर केले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांनी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर हे विजेतेपद जिंकले, अशात फॅन्समध्ये हा आनंद ओसांडून वाहणार यात काही शंकाच नाही.
घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @thebharatpost_नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सुंदर भारत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गर्दीने तिला उचलण्यापूर्वी ती सहमत होईल अशी आशा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “टीएफआय आणि तेलुगू लोक कधीही निराश करत नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.