
वय तर फक्त एक नंबर! तरुणांनाही लाजवेल असा आजोबांचा फिटनेस अन् 45 सेकंदाच्या त्या व्हिडिओने सर्वांनाच हादरवलं; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक वृद्ध व्यक्ती आश्चर्यकारक पराक्रम दाखवताना दिसतो. वय सरत असतानाही त्याच्यातील फिटनेस संपलेला नसतो. व्यक्तीच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्या दर्शवतात की तो फार म्हतारा झालेला आहे पण तरीही त्याच्यातील उत्साह काही कमी झालेला नसतो. एका जागेवरून दुसऱ्या जागी उड्या मारत तो असे अनेक कर्तब करून दाखवतो जे पाहून कुणाचेही डोळे खुलेच्या खुले राहतील.
Age तो बस एक नंबर है, असली खेल तो जज़्बे का होता है।
दादा जी को देखिए, शरीर भले थक गया हो पर हौसला आज भी दौड़ता है। बशीर बद्र की ये पंक्तियाँ इस पर खूब जँचती हैं –
“हौसलों के आगे उम्र की कहाँ औक़ात होती है, ये तो बस एक गिनती भर होती है।” pic.twitter.com/hMnYIfvq3X — Shalini Singh (@Bahujan_Era) January 11, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @Bahujan_Era नावाच्या इंस्टाग्राम एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणांनाही लाज आणेल अशा या व्हिडिओने लोकांना फक्त आश्चर्यच केलं नाही तर त्यांना फिटनेस करणं किती महत्त्वाचं आहे यासाठी प्रेरित देखील केलं. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुमच्यात धाडस आणि आवड असली पाहिजे, वय काही फरक पडत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वय फक्त एक आकडा आहे भाऊ, प्रेरित राहा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हो, या वयात, त्याने हे सत्य सिद्ध केले आहे: व्यक्तीने कर्मशील असले पाहिजे. कोणत्याही वयात तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.