(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
हत्ती आणि केअरटेकरमधील सुंदर नातं दर्शवणाऱ्या या व्हिडिओत सुरुवातीलाच केअरटेकर एका खुल्या मैदानात एंट्री घेताना दिसतो. तो दुरुनच आपल्या मित्राला हाक मारत मिठीसाठी आपले हात पसरवतो. हा मित्र दुसरा तिसरा कोण नसून एक चिमुकला हत्ती असतो. केअरटेकरला पाहताच आईसोबत उभा असलेला हत्ती धावत पळत केअरटेकरच्या जवळ जातो. परंतु हत्ती त्याला मिठी मारेल याआधीच केअरटेकर उठतो आणि दुसऱ्या दिशेला जाऊन उभा राहतो. तो हत्तीला असे दर्शवत असतो की त्याला मिठी नाही पाहिजे. हे पाहताच हत्तीचे बाळ नाराज होते आणि दुसरीकडे मान फिरवत त्याला आपल्या लाथ मारण्याचा प्रयत्न करते. जणू ते म्हणत आहे की, “तू निघ आता मी तुझ्या जवळ येणार नाही”. चिमुकल्या हत्तीचा राग पाहताच केअरटेकर त्याला मनवण्याचा प्रयत्न करतो ज्यावर हत्ती केअरटेकरवर धावून जातो आणि दोघेही एकत्र मिळून पकडा पकडी खेळू लागतात. मुख्य म्हणजे दुरुनच दोन मोठे हत्ती त्यांची ही मस्ती पाहत असतात पण दोघेही यात कोणता हस्तक्षेप करत नाहीत कारण त्यांना ठाऊक आहे की, दोघेही चांगले मित्र आहेत.
चिमुकल्या हत्तीचे गोंडस रुप आणि त्याचा राग पाहून आता यूजर्सना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडिओ @informedofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला माणसांपासून दूर असे जीवन हवे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या गोंडस चिमुकल्याला मिठी न मारल्याबद्दल तो त्या लाथाला पात्र आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो चिमुकला हत्ती म्हणत असेल, आई बघ गं याने मला मिठी दिली नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






