
अरे जरा तरी लाज वाटू द्या! शिक्षकाने अपंग मुलाच्या डोळ्यात भरली मिरची पावडर, बेल्टने मारत शिक्षकाने ओलांडली मर्यादा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
ही घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील दिवज्योती निवासी शाळेत घडून आली. इथे एका शिक्षकाने अपंग मुलाला बेल्ट आणि प्लास्टिक पाईपने मारल्याची घटना घडली आहे. इतकंच काय तर शिक्षकाच्या पत्नीनेही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात तिखट मिरची पावडर टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. एका अपंग मुलासोबत अशी काही घटना होणे आणि तेही एका शिक्षकाच्या हातून ही खरंच एक लज्जास्पद गोष्ट आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, लहान मुलगा जमिनीवर पडलेला असून त्याला बेदम मारहाण होत असल्याचे समजते. मुलगा वेदनेन कळवळतो पण त्याच्यावर कोणतीही दया दाखवली जात नाही. व्हिडियोत मुलाने केलेला तो आक्रोश कुणाच्याही मनाला सुन्न करुन जाण्यासारख्या आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला जातो आणि व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती मागून हसत असल्याचे ऐकू येते. आजूबाजूला अनेक लोक उभे राहून हा सर्व प्रकार पाहत होते पण एकानेही विद्यार्थ्याला वाचवण्याचा किंवा शिक्षकाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
అమానవీయ ఘటన.. వికలాంగ విద్యార్థి కళ్లలో కారం కొట్టి ప్లాస్టిక్ పైపుతో చావబాదిన ఉపాధ్యాయుడు కర్ణాటకలోని బాగల్కోట్లో ఘటన ఉత్తర కర్ణాటకలోని నవగర్ ప్రాంతంలోని ప్రత్యేక అవసరాల గల పిల్లల కోసం ఏర్పాటు చేసిన రెసిడెన్షియల్ పాఠశాలలో 16 ఏళ్ల ఓ వికాలాంగ విద్యార్థి కళ్లలో కారం కొట్టి..… pic.twitter.com/q5OUBeHpCE — Telugu Scribe (@TeluguScribe) December 21, 2025
हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL
दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @TeluguScribe नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्यवस्थापनाला कठोर शिक्षा व्हायला हवी… त्यांनाही तीच शिक्षा द्या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे मनोरुग्ण दहशतवाद्यांपेक्षा धोकादायक आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या शिक्षकाला नक्की काय शिक्षा मिळाली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.