Turkey Parliament बनली 'रणांगण'! Erdogan यांच्या खासदाराला विरोधकांनी भर सभागृहात बदडले; अर्थसंकल्पावरून 10 मिनिटे तुंबळ हाणामारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Turkey parliament fight December 2025 video : जगातील लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेतून पुन्हा एकदा धक्कादायक आणि लज्जास्पद दृश्ये समोर आली आहेत. तुर्की संसदेत (Grand National Assembly) २०२६ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार एकमेकांशी भिडले. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, भर सभागृहात खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) होत असून, जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या ‘एके’ (AK) पक्षाचे खासदार आणि माजी मंत्री मुस्तफा वरांक हे अर्थसंकल्पावर आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले होते. यावेळी विरोधी पक्ष असलेल्या सीएचपी (CHP) चे उपाध्यक्ष मुरात अमीर आणि इल्हामी आयगुन त्यांच्याकडे गेले. अर्थसंकल्पातील काही तरतुदींवरून त्यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली. मुरात अमीर आणि वरांक यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, त्यांच्यात थेट धक्काबुक्की सुरू झाली आणि अवघ्या काही सेकंदात संपूर्ण सभागृह रणांगणात रूपांतरित झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terrorist Attacks : नवीन वर्षाच्या जल्लोषावर ISISचे सावट; जागतिक स्तरावर हल्ल्यांचा मोठा कट, ‘AI’ चा वापर करून दहशतवादी देणार चकवा
संसदेच्या महासभेत जवळपास १० मिनिटे हा गोंधळ सुरू होता. दोन्ही बाजूंचे डझनभर खासदार एकमेकांवर धावून गेले. धक्काबुक्कीत काही खासदार खाली पडले, तर काहींना किरकोळ दुखापतही झाली. या राड्यातून आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी खासदारांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, एमएचपी (MHP) पक्षाच्या खासदारांनी आपले सरचिटणीस देवलेट बहसेली यांच्याभोवती मानवी भिंत उभारली होती, जेणेकरून त्यांना कोणतीही इजा होऊ नये. तणाव वाढल्याने संसदेचे अध्यक्ष नुमान कुर्तुलमुस यांनी कामकाज १० मिनिटांसाठी थांबवले.
A fight broke out between AK Party and CHP MPs during budget discussions in the Turkish Grand National Assembly. pic.twitter.com/fQ4dJ7dJdv — The Daily News (@DailyNewsJustIn) December 21, 2025
credit : social media and Twitter
विरोधी पक्षाने २०२६ च्या अर्थसंकल्पावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तुर्कीमध्ये सध्या महागाईने उच्चांक गाठला असून, सरकारने मांडलेला १८.९ ट्रिलियन लिराचा हा अर्थसंकल्प जनतेला अधिक गरिबीत ढकलणारा असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. २.७ ट्रिलियन लिराची तूट आणि व्याजावरील वाढता खर्च यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. याच रागातून संसदेत ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट
हंगामी स्थगितीनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा तणाव कायम होता. मात्र, राष्ट्रपती एर्दोगान यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याने सरकारने कोणत्याही चर्चेविना विधेयक मतदानाला टाकले. अखेर, ३२० विरुद्ध २४९ मतांनी २०२६ चा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यासोबतच २०२४ चा अंतिम लेखा कायदाही मंजूर झाला. या विजयानंतर सत्ताधारी पक्षाने जल्लोष केला असला, तरी संसदेतील या कृत्यामुळे तुर्कीच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Ans: २०२६ च्या केंद्र सरकारी अर्थसंकल्पावरील (Budget 2026) मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
Ans: सत्ताधारी एके पक्षाचे खासदार मुस्तफा वरांक आणि विरोधी सीएचपी पक्षाचे उपाध्यक्ष मुरात अमीर यांच्यात मुख्य संघर्ष झाला.
Ans: होय, संसदेत ३२० खासदारांनी अर्थसंकल्पाच्या बाजूने मतदान केल्यामुळे २०२६ चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.






