
एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल केले जातात. इथे असे अनेक व्हिडिओ शेअर होतात ज्यातील दृश्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. नुकताच इथे एका थरारक अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच थरकाप उडवला. व्हिडिओमध्ये एक तरुण ट्रान्सफॉर्मरवर चढून विजेच्या तारांजवळ काम करताना दिसला पण याचवेळी अचानक त्याच्यासोबत एक भयंकर अपघात घडतो आणि पुढे काही क्षणातच तो खांब्यावरुन गायब होतो. विजेच्या खांब्यावरुन ज्वाला बाहेर पडू लागतात आणि हे सर्वच दृश्य अंगावर काटा आणणारे ठरते. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये एक तरुण विजेच्या खांब्यावर चढून विजेच्या तारा दुरुस्त करताना दिसून येतो. पण तेवढ्यातच तिथे एक मोठा स्फोट होतो आणि क्षणातच माणूस अचानक गायब होतो. व्हिडिओमध्ये पुढे खांब्याला आग लागल्याचे दिसते, खांब्यावरून धुरही निघू लागतो, हे सर्वच दृश्ये फार भयाण दिसते जे पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. आजूबाजूचे लोक घाबरून आरडाओरड करू लागतात. ही घटना इतक्या लवकर घडली की कुणालाही काय घडलं ते समजलंच नाही. ही घटना नेहमी कुठे घडली याची पुष्टी झाली नसली अनेकजण या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कुणी याला एआय मनात आहेत तर कुणी असा अंदाज लावत आहेत की माणूस परवानगीशिवाय ट्रान्सफॉर्मरवर चढला असावा.
हा व्हायरल व्हिडिओ @dark_web_vides नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एडिटिंग व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ दुसऱ्या दुनियेत टेलिपोर्ट झाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अर्थातच हे खरं नाही कारण कॅमेरा अँगल एका सेकंदात बदलला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.