
इंडोनेशियामध्ये भयानक ज्वालामुखीचा झाला विस्फोट, 13 किमीपर्यंत पसरली धुराची लाट... दृष्य पाहून सर्वच हादरले; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी सर्वत्र अलर्ट जारी केला आहे. इंडोनेशियन भूगर्भीय संस्थेचे प्रमुख मुहम्मद वाफिद म्हणाले की, पूर्व जावामधील पर्यटन स्थळ बालीपासून सुमारे ३१० किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्वालामुखीतून दुपारी २:१३ वाजता (स्थानिक वेळेनुसार) विनाशकारी पायरोक्लास्टिक प्रवाह उत्सर्जित झाला. याचे हे दृष्य इतके भयानक दिसत होते की पाहून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
#Indonesia 🇮🇩 #volcano_eruption live : The webcam footage of a pyroclastic flow from Mount Semeru’s eruption showing superheated ash and rocks surging down the slope at high speeds amid surrounding vegetation. pic.twitter.com/XJtCajzjrZ — 𝐒𝐡𝐚𝐤𝐢𝐫 𝐀𝐡𝐦𝐞𝐝 𝐁𝐨𝐫𝐛𝐡𝐮𝐲𝐚𝐧 (@Shk__R) November 19, 2025
इंडोनेशियन सरकारने एक निवेदन जारी करून लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “जनतेला सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी सेमेरू पर्वताच्या विवराच्या किंवा शिखराच्या ८ किलोमीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ नये. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, परिसरात तीक्ष्ण दगडांचा आघात होण्याचा धोका आहे.” तथापि, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून या ज्वालामुखीच्या उद्रेकाची तीव्रता मोजता येते. व्हिडिओमध्ये आकाशात धुराची लाट मोठ्याने हवेत उठताना स्पष्टपणे दिसून येते, ही लाट प्रकर्षाने वाढतच असते. अहवालांनुसार, ही धुराची लाट १३ किलोमीटरपर्यंत वाढल्याचे वृत्त आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.