(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका लग्नात नाट्यमय प्रकार घडला. लग्न सुरु असतानाच अचानक वराच्या बायकोची एंट्री होते जी सर्वांसाठीच एक आश्चर्यकारक सरप्राईज ठरते. एवढंच काय तर पतीचा खोटेपणा उघड करण्यासाठी ती सोबत पुरावे देखील घेऊन आलेली असते. व्हिडिओमध्ये पत्नी सर्वांना काही फोटो दाखवून तिची बाजू पटवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की, “माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, याच मुलाने माझ्याशी लग्न केले होते आणि आता तो पुन्हा लग्न करत आहे.” तिने हे देखील उघड केले की त्यांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर कुटुंबाच्या उपस्थितीत एक भव्य लग्न केले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती थेट विनयला विचारते, “आपला घटस्फोट झाला का? सर्वांसमोर सांगा.” ती गर्दी थांबवते आणि म्हणते, “कोणीही हस्तक्षेप करणार नाही.”
पत्नीच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचा नवरा नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी ३० मार्च २०२२ रोजी कोर्ट मॅरेज केले आणि ८ डिसेंबर २०२२ रोजी ते लग्नबंधनात अडकले गेले. नंतर दोघांमधील वाद वाढले आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली. घटस्फोट अद्याप निश्चित झाला नव्हता, म्हणून ती दुसरे लग्न थांबवण्यासाठी गुजरातमधील अंकलेश्वर येथून आली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि दोन्ही पक्षांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी हे स्पष्ट केलं की घटस्फोटाशिवाय पुनर्विवाह करणे बेकायदेशीर आहे आणि चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






