
पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं काढलं अन्...थरारक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
दिल्लीतील प्रेम नगर भागात ही घटना घडली. एक चिमुकला आपल्या घराबाहेर चेंडूने खेळत होता. यावेळी शेजारच्या पाळीव पिटबुलची नजर त्याच्यावर पडली आणि त्याने लगेच चिमुकल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकल्याच्या डोक्यावर आणि कानावर गंभीर जखमा झाल्या. घराजवळ घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हि कॅमेरात कैद झाली आणि हे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक मुलगा रस्त्यावर खेळत असतानाच मालकाच्या जवळून पळ काढत पिटबुल त्याच्यावर हल्ला चढवताना दिसून येतो. तो चिमुकल्याला ओढत रस्त्यावर फरफटत नेतो. पुढे तो काही करेल याआधीच त्याची मालकीन त्यांच्या दिशेने धावत येते आणि पिटबुलला चिमुकल्यापासून वेगळे करते. मुलाला रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. माहितीनुसार, या घटनेनंतर कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पिटबुलच्या मालकाला आता अटक करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की, या कुत्र्याने यापूर्वीही अनेक वेळा परिसरातील लोकांना धमकावले आहे आणि जखमी केले आहे.
Pitbull attacks 6-year-old in Delhi’s Prem Nagar, bites off the child’s ear. The owner of the dog has been arrested. The incident took place on Sunday evening, when the child was playing outside his house. pic.twitter.com/jl1LKmndY8 — Vani Mehrotra (@vani_mehrotra) November 24, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @vani_mehrotra नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देनेहमीच कुत्र्यांचे मालक.. अहंकारी बेजबाबदार आणि अज्ञानी असतात. ते त्यांना खायला घालतात आणि कुत्रे इतरांना चावतात. मालक म्हणून त्यांनी घेतलेली जबाबदारी शून्य” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरीही त्यांच्यावर बंदी का नाही, दरवर्षी तेच प्रकरण सुरू राहते, कुत्र्याने मालकालाच चावावे अशी इच्छा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या असुरक्षित कुत्र्यांवर बंदी का घालू नये?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.