(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे, ही क्लिपउझबेकिस्तानमधील एका पारंपारिक लग्न समारंभातील आहे. वधू आणि वर त्यांच्या पाहुण्यांसमोर एका पारंपारिक खेळ खेळत होते ज्यात वर आणि वधूला दोरीचा शेवट किंवा कॉइलमध्ये लपलेली एखादी वस्तू शोधायची होती. सर्व वर्हाडी आनंद आणि उत्साहाने हा खेळ पाहत असतात पण क्षणातच हा आनंद एका विचित्र शांततेत परावर्तीत होतो. वधू हा खेळ जिंकते आणि आपल्या हातात एक वस्तू पकडून ती हात वर करुन सर्वांना ती जिंकली असल्याचा संकेत देते. पण वराला मात्र ही गोष्ट आवडत नाही आणि पुढच्याच क्षणी तो तिच्या डोक्यावर एक जोरदार थप्पड मारतो. वधूला काही क्षणासाठी नक्की काय घडलं ते समजत नाही. ती स्तब्ध असते, मान खाली घालून ती हा अपमान पचवते. पण स्वतःच्याच लग्नात स्वतःचाच होणार पती जेव्हा एका शुल्लक कारणावरून आपल्याला मारतो तेव्हा त्याला नववधूला काय वाटलं असावं याची कल्पना कुणीही करू शकत नाही. काही वेळाने एक महिला वधूला वरापासून दूर दुसऱ्या दिशेला घेऊन जाताना दिसते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
माणसाची वृत्ती आनंदी वातावरणालाही दु:खात कसे बदलून टाकते ते आपल्याला या व्हिडिओतून पाहता येते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @historyoverlooked नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तरीही संपूर्ण लग्नात एकही खरा पुरूष नव्हता. एकाही व्यक्तीने तिचा बचाव केला नाही. सर्वांना लाज वाटली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकीचे सगळेही आश्चर्यचकित झालेले दिसत होते. मला आशा आहे की कोणीतरी तिला सांगितले असेल की ‘तिला त्याच्यासोबत राहण्याची गरज नाही’” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर तो सर्वांसमोर असे करत असेल तर तिला दीर्घकाळ मारहाण खावी लागणार आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






