
एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्... चित्तथरारक Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळे आणि अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे असे बरेच व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातील दृश्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. अलीकडेच इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका महिलेसोबत भयंकर घटना घडून आल्याचे दिसून आले. महिला एका कारखान्यात काम करत होती आणि याचवेळी तिच्यासोबत असे काही घडते जे पाहून सर्वांच्याच अंगावर काटा येतो. सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटतं, पण काही सेकंदातच संपूर्ण परिस्थिती दुःखद बनते. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला कारखान्यात काम करताना दिसते. ती एका मोठ्या रोलरसारख्या मशीनजवळ उभी असते आणि याचवेळी तिच्यासोबत एक मोठा अपघात घडतो. ती मशीन काळजीपूर्वक तपासते की सर्वकाही व्यवस्थित चालले आहे का, ती महिला मशीन तपासण्यासाठी थोडासा हात पुढे करते. पण तिची हीच चूक तिला पुढे जाऊन महागात पडते. व्हिडिओत दिसते की, महिला मशीनजवळ तिचे काम करत असते. ती मशीन तपासण्यासाठी थोडासा हात पुढे करते पण मशीन रोल करत असताना अचानक तिचा हात पुढे सरकतो आणि क्षणार्धात ती रोलरमध्ये अडकून गोल गोल फिरू लागते. तिचे संपूर्ण शरीर मशीनकडे खेचले जाते आणि ती कागदाच्या तुकड्यासारखी गुंडाळली जाते. मशीनमध्ये अडकलेली, ती महिला वर्तुळात फिरते, हे दृश्य इतके भयानक दिसते की पाहणाऱ्यांचा श्वास काही क्षणांसाठी रोखला जातो.
महिलेचं नशीब यावेळी चांगलं असत की काही क्षणातच ही मशीन अचानक फिरायची बंद होते ज्यामुळे महिलेचा जीव वाचतो. या अपघातात ती जखमी नक्कीच झाली असेल पण तिचा जीव मात्र यात वाचला आणि ती सुखरूप या अपघातातून बाहेर निघाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही जण कारखान्यात काम करताना सुरक्षेच्या अभावाबद्दल तक्रार करत आहेत, तर काही जण मशीनच्या धोकादायक ऑपरेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
pic.twitter.com/gjL9QbUpL4 — Crazy Moments On X (@OnCrazyx) November 14, 2025
दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @OnCrazyx नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काय झालं तिला, ती जिवंत आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित तिने आधी मशीन बंद करायला हवी होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशा प्रत्येक कारखान्यातील अपघात १००% शुद्ध मूर्खपणामुळे होतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.