(फोटो सौजन्य: Instagram)
आजकाल लग्नसमारंभात कधी काय वेगळं दिसून येईल ते सांगता येत नाही. प्रत्येकाला आपलं लग्न जरा हटके आणि सर्वांना आश्चर्यचकित करेल असं हवं असत आणि यातूनच जन्माला येतात त्या थक्क करणाऱ्या आयडीयाज. कमळातून एंट्री असो वा हवेतून वर-वधूची लग्नमंडपातली एंट्री नेहमीच लक्षवेधी ठरते पण नुकतेच सोशल मीडियावर लग्नाच्या एंट्रीचा एक अनोखा आणि चित्तथरारक असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओची सर्वात मोठी खासियत म्हणजे वर-वधूची एंट्री, ही एंट्री लक्षवेधी ठरते त्यांच्या अनोख्या सजावटीमुळे… पहिले काही सेकंद हे दृश्य पाहून आपल्याला भीती वाटेल पण व्हिडिओचा शेवट तुमच्यासाठी खरी ट्रीट असेल. चला नक्की काय घडलं या व्हिडिओत ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात तुम्हाला लग्नसमारंभातील काही अद्भुत दृश्ये दिसून येतील. व्हिडिओत नवरा-नवरीची खास एंट्री होत असते. व्हिडिओची सुरुवात एखाद्या हॉरर चित्रपटाच्या पहिल्या दृश्यासारखी होते… पांढऱ्या कापडात गुंडाळलेली मोठी वस्तू पाहून असं वाटत जणू व्यक्तींचे मृतदेह त्यात गुंडाळून ठेवले आहेत. पण अचानकच हे दृश्ये पालटते आणि एक अनोखा ट्विस्ट आपल्या समोर येतो. पांढऱ्या कापडात लपेटलेली ही वस्तू खरंतर पॉकेट फुगे असतात, नवरा-नवरीची एंट्री पुढे जात असतानाच हे फुगे फुगू लागतात. खरंतर या एअर बॅग्ज असतात ज्या खास सरप्राईज एंट्रीसाठी तयार करण्यात आल्या होत्या. भीतीदायक वाटणारे हे दृश्य काही क्षणातच बदलते आणि घाबरलेले युजर्स आनंदाचा निःश्वास घेतात. लग्नातील ही अनोखी सरप्राइज एंट्री आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @ghantaa नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी तर RIP लिहणार होतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरेरे, हे ऐकून मला खूप भीती वाटली. मला खरोखर वाटलं होतं की त्याच्या लग्नात कोणीतरी वारलं असेल पण आता मी स्वतःला मोठ्याने हसण्यापासून रोखू शकत नाहीये.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजकाल काय काय नाटक चालू झालीयेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






